किनवटमध्ये 27 रोजी 7 बाधितांची भर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, February 28, 2021

किनवटमध्ये 27 रोजी 7 बाधितांची भर

 



किनवट   : शनिवार (दि. 27 फेब्रुवारी) रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 29 व्यक्तींची एँटिजेन तपासणी केली. त्यापैकी 7 जण  बाधित आढळले. 

           

         बाधितांमध्ये एस. व्ही.एम. कॉलनी येथील 21 वर्षाचा 1 पुरुष, शिवाजीनगर येथील 18 वर्षाचा 1 तरुण, दत्तनगर, गोकुंदा येथील 14 वर्षाची 1 मुलगी, किनवट येथील 36 वर्षाचा 1 पुरुष, 28 व 21 वर्षाच्या 2 महिला आणि कमठाला येथील 37 वर्षे वयाचा 1 पुरुष अशा 7 जणांचा समावेश आहे. बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 19,  व होम क्वारंटाईन 40 अशा एकूण 59 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे  व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.


किनवटतालुका कोरोना संक्षिप्त अहवाल


आरटीपीसीआर टेस्ट,


आज घेतलेले स्वॅब - 14,


आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-0,


स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 14,


स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 0,




ऍन्टिजेन टेस्ट


ऍन्टिजन टेस्ट- 29,


आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या- 7,


निगेटिव्ह अहवाल- 22,




आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 7,



आज मृत्यू - 0,


रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 19 ( 40 होम क्वारंटाईन)

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News