सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला दि.३ पासून प्रारंभ झाला असून दि. २१ मार्च पर्यंत पालकांनी अर्ज भरावेत -गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, March 3, 2021

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला दि.३ पासून प्रारंभ झाला असून दि. २१ मार्च पर्यंत पालकांनी अर्ज भरावेत -गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने

 



किनवट : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला दि.३ मार्च पासून प्रारंभ झाला असून दि. २१ मार्च पर्यंत पालकांनी अर्ज भरावेत , असे आवाहन गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी केले.

           याबाबत सविस्तर वृत्त असे की , बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम , २०० ९ मधील कलम १२ ( १ ) ( सी ) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील मुला / मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे . दरवर्षी प्रमाणे सन २०२१-२२ या वर्षाची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असून तालुक्यातील सर्व संबंधित शाळांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. तसेच  दि . ०३/०३/२०२१ ते दि. २१/०३/२०२१ या कालावधीमध्ये पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करावी. कोणीही लाभार्थी यापासून वंचित राहू नये, असे शिक्षण संचालनालय, पुणेचे शिक्षण संचालक ( प्राथमिक )  द.गो.जगताप यानी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहिर केल्याचे गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी कळविले केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News