एक घास चिऊचा,,, मानवता हा एक धर्म
-गजानन गोपेवाड
आपण आपल्या आजूबाजूला लहानपणी भरपूर पक्षी बघितले असतीलच, चिमणी, कावळा, बदक,बगळे, अजून शेतीतील पक्षी तसेच शेतामध्ये आपले बाबा पाणी देत असताना ,पिकांना पाण्याच्या दंडामध्ये(पाटामध्ये) खूप छोटे कीटक वेचतांना आपण बघितले असतीलच, तळ्याच्या काठी, नदीच्या काठी ,नाल्याच्या काठी, जिथे पाणी आहे तिथे तुम्ही पक्षी बघितले असतीलच पक्षी पाण्यामध्ये असताना बघीतले असतीवच, दृश्य पक्ष्यांच्या पिसांचा रंग त्यांची चोच पाहून मन भरून जाते परंतु हल्ली या विज्ञान युगात इंटरनेटच्या जाळ्यामुळे बरेचसे पक्षी संपुष्टात आलेले आहेत .म्हणून जे पक्षी आहेत ते पक्षी आपण निव्वळ विद्यार्थ्यांना चित्रात दाखवतो .आज रोजी जंगली प्राणी सुद्धा आपण चित्रात दाखवतो. वाढणारी लोकसंख्या दिवसेंदिवस झालेली विज्ञानाची प्रगती जंगलामध्ये झालेली शेतीची प्रगती ह्यामुळे जंगलातील प्राणी कुठे जाणार ? पक्षांचे सुद्धा तसेच आहे ,आज आपण एखाद्या पक्षाचे चित्र घेऊन विद्यार्थ्यांनी शिकतो हा पक्षी असा आहे त्यांच्या आपण रंग रूप पीसारा वर्णन करतो, आहे त्याची चोच कशी आहे , वर्णन करत असतो .परंतु प्रत्यक्षात जर बघितले तर तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये पहिले चिऊ ताई कावळे अन्न टिपतांना चोचीत दिसत होते. आज रोजी आपल्या अंगणामध्ये तरी काय आजूबाजूला साधा पक्षी खेळताना सुद्धा दिसत नाही .आमच्या गावात सायंकाळी बगळ्यांची शाळा भरत असे, आमचे मित्र मंडळी लहानपणी म्हणायची बगळ्यांची शाळा आहे आनंद वाटायचा, आकाशामध्ये बघणार पक्षांचा थवा बगळ्यांचा थवा मोठ्या उंच भरारी आकाशात वावरताना दिसत होता. पिंपळाच्या वृक्षावर, वडाच्या वक्षावर ,लिंबाच्या वृक्षावर ,जाऊन बसायचे बगळयाचा किलबिलाट आवाज जणू असं वाटायचं की कापसाचा ढगच आहे, जणू वाटायचे बगळ्यांची शाळा भरली, हे निसर्गाचे निरीक्षण केले गेले तर खरच माणसाचे आरोग्य चांगले राहते, पण आज रोजी असे होताना दिसून येत नाही .याला कारण आपणच आहोत बरेच पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे याला सुद्धा कारण आपणच आहोत .प्रगती ही पक्षासाठी घातक असलेली आहे परंतु प्रगती करणाऱ्या माणसाचा स्वभाव गुणधर्म असले तरीही त्या प्रगतीतून काही ना काही वाईट कृती होत असते .मानवता धर्म आपला असा आहे आपल्या समोर जर कोणी भुका असलं कोणी तहानलेल्या दिसले तर आपण त्यांना अन्न व पाणी देतच असतो, परंतु आपल्या चिऊ ताई ,कावळे, बदक, मोर, ज्या पक्षी आपल्याला स्वतःहून कधी अन्नपाणी मागत नाही जंगलामध्ये कुठे पाण्याची साठवण दिसत नसते ,म्हणून आपण आपल्या घराच्या छतावर शेतात तिथे एक वाटी पाणी भरून आणि असे आपल्या घरामध्ये धान्याचा नास होत असतो व ज्वारी गहू बाजरी मका चे मक्याचे पीठ तांदूळ तांदळाचे पीठ अन्न धान्य यांना जर आपण वाटी मध्ये ठेवलं तर सहज पक्षी येऊन आपल्या घरामध्ये अंगणामध्ये, झाडावर, छतावर, माडीवर, जिथे जागा मिळेल तिथे ठेवा, पक्षी येऊन नक्कीच खाईल आणि ते पाहता तुम्हाला फार आनंद वाटेल. आपला मानवता धर्म आहे एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ .पक्षी वाचवणे ही आपली काळाची गरज आहे प्रगती करणं हीसुद्धा विज्ञानाची गरज आहे. गरज असली तरीही पण कुठल्याही प्राण्यांचे पक्ष्यांचे जीवन संपुष्टात येऊ नये या दृष्टीने आपण त्यांचे संगोपन ,संवर्धन, जतन केले पाहिजे.
आम्ही आमच्या शाळेमध्ये नारळाच्या करवंट्या, बिसलेरी आडवा काप करून त्यामध्ये पाणी भरून त्यात दोन्ही टोकाला दोरीने बांधून झाल्यावर टांगतो, शाळेमधील जे धान्य खराब झाली धन्य आहे व तांदूळ मटकी हे धान्य गोळा करुन आम्ही एका वाटित ठेवतो. आणि पाणी ठेवतो. जेणेकरून पक्षी तिथे येऊन आपलेअन्न व त्यांना पिण्यासाठी पाणी आणि खाण्यासाठी धान्य मिळेल अशी व्यवस्था आम्ही मानवता धर्म म्हणून करत आहोत ,आपल्याला आमचा प्रयोग चांगला वाटला तर आपण सुद्धा आपल्या गावामध्ये शाळेमध्ये घरामध्ये जिथे तुम्हाला जागा मिळेल तिथे तुम्ही करू शकता,
"खोप्या मध्ये खोपा सुगरणीचा खोपा
असेच सुगरण ह्या पक्षाला म्हटलं नाही, गवताची काडी ,काडी, जमा करून पक्षी सुंदर व मजबुत घरटे करते, अशा प्रकारचे घरटे मानवाला विणने जमणारच नाही, मला एवढेच म्सणायचे होते की ,आपण निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्तं सहवास करा, मन प्रसन्न तर राहतेच, ऊलट माणुस प्रकृतीची पण ऊत्तम राहण्यासाठी मदत होणार आहे. "हा उपक्रम जास्तीत जास्त शिक्षकांनी करावा असे आव्हान अग्निपंख शैक्षणिक समूह महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक तथा राज्य समन्वयक गजानन गोपेवाड यांनी आवाहन केले आहे व वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत ऊबाळे वनपरिक्षेत्र महांगाव यांनी केले आहे
वन्यजीव जीव संरक्षण व संवर्धन करा, असे आवाहन केले जात आहे
-गजानन गोपेवाड,
राज्य समन्वयक महाराष्ट्र




No comments:
Post a Comment