संमारंभासाठी आलेल्या लोकांनी कोविड- १९ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निश्चित केलेले नियम व अटीचे उल्लंघन न करता उपाय योजना पाळाव्या -जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, भाप्रसे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, March 7, 2021

संमारंभासाठी आलेल्या लोकांनी कोविड- १९ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निश्चित केलेले नियम व अटीचे उल्लंघन न करता उपाय योजना पाळाव्या -जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, भाप्रसे

 




नांदेड : जिल्ह्यात आज रविवार ( दि.०७ ) रोजी कोरोनाचा उद्रेक पाहता धार्मीक / सांस्कृतीक सभागृहात / वैयक्तीक / प्रार्थनास्थळे । लग्नसमारंभ इत्यादी ठिकाणी कार्यक्रमासाठी जमावाच्या गर्दीच्या नियंत्रणा बाबत विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदी प्रमाणे जिल्हाधिकारी तथा  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपिन इटनकर, भाप्रसे यांनी कडक निर्बंध पाळण्याचा आदेश जारी केला आहे.

           नांदेड जिल्ह्यात कोविड -१९ रूग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत असल्याने सदर विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदी प्रमाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे कोणतीही आपत्ती रोखण्यासाठी किवा आपत्तीविरूध्द प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत. त्याअर्थी त्यांनी धार्मीक / सांस्कृतीक सभागृहात / सार्वजनिक / वैयक्तीक / प्रार्थनास्थळे / संमारंभासाठी लोकांची कोविड- १९ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निश्चित केलेले नियम व अटीचे उल्लंघन होऊ नये तसेच सदर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने उपाय योजनेचा एक भाग म्हणून नांदेड जिल्हयातील धार्मीक / सांस्कृतीक सभागृहात / वैयक्तीक / प्रार्थनास्थळ / लग्नसमारंभाच्या ठिकाणी खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून आयोजनासाठी निर्देश दिले आहेत . 

अटी व शर्ती : >एका वेळेस धार्मीक / सांस्कृतीक सभागृहात / सार्वजनिक / वैयक्तीक / प्रार्थनास्थळे / समारंभाच्या ठिकाणी मंगल कार्यालय मधील कर्मचारी व लग्नासाठी उपस्थित एकूण सर्व व्यक्तींची संख्या ५० पेक्षा जास्त असणार नाही . > Social Distancing चे पालन करावे . > धार्मीक / सांस्कृतीक सभागृहात / सार्वजनिक / वैयक्तीक / प्रार्थनास्थळे / समारंभाच्या प्रवेशापुर्वी हॅन्डवॉश , सॅनिटायझरचा वापर करणे तसेच थर्मल स्क्रिनिंगद्वारे प्रत्येक व्यक्तींची तपासणी करूनच प्रवेश देणे . > सदर ठिकाणी सर्वांच्या चेह - यावर मास्क असणे व सामाजिक अंतराचे पालन करणे . > मानवी संपर्कात येणा - या सर्व वस्तू / ठिकाणांचे वेळोवेळी नियमीत र्निजंतूकीकरण करणे . » शासकीय कार्यालयासमोर , उपोषणे , मोर्चे , धरणे आंदोलने इ . प्रतिबंध असेल . सदर कार्यक्रम प्रतिनिधीक स्वरूपात करण्यात यावे . दोन किंवा तीन व्यक्तींनीच एकत्र येऊन निवेदन सादर करावेत . > सदर धार्मीक / सांस्कृतीक सभागृहात / सार्वजनिक / प्रार्थनास्थळे / संमारंभ विहीत कालावधित करणे . > मुबलक प्रमाणात सॅनिटायझरचा साठा असावा . 


> कोणताही आजारी व्यक्ती धार्मीक / सांस्कृतीक / सार्वजनिक / प्रार्थनास्थळे / समारंभास येणार नाही . अथवा त्यांना प्रवेश देऊ नये . » धार्मीक / सांस्कृतीक सभागृहात / सार्वजनिक / प्रार्थनास्थळे / समारंभाच्या ठिकाणी ५५ वर्षावरील जेष्ठ नागरिक , ज्यांना मधुमेह ( Diabetes ) , रक्तदाब ( Blood Pressure ) आणि इतर अनेक आजार टाळावा . > समारंभाला येणा - या लोकांची यादी Incident Commander तथा तहसिलदार यांना सादर करावी , सदर यादी समारंभाच्या अगोदर सादर करावी व त्यामध्ये समारंभाला येणा - या लोकांचे मोबाईल क्रमांक व पत्ते असणे आवश्यक राहील . > समारंभाच्या आवारात धुंकण्यास प्रतिबंध करण्यात यावे . > नागरीकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क लावले नसल्यास प्रथमतः ५०० / - रू दंड लावण्यात येईल . व तदनंतरच्या उल्लंघनास ५०० / - रू . दंड व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल . > वाहनचालक / दुचाकीस्वार हे विना मास्क वाहन चालवित असल्यास ५०० / - रू . दंडासह वाहन जप्त करण्यात येईल . > आस्थापना / दुकाने यांनी उक्त नियमांचे पालन नाही केल्यास प्रथमतः ५००० / - रू . दंड , दुस - यांदा नियमांचे भंग केल्यास ५ दिवसासाठी दुकान सिल व ५००० / - रू . दंड आणि तिस - यांदा नियमांचे भंग केल्यास सदर आस्थापना / दुकान सिल करून कायमचे परवाना रद्द करण्यात येईल . > वरील अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यास आयोजकांवर कार्यवाही करण्यात येऊन त्याचप्रमाणे मंगल कार्यालय , हॉटेल , समारंभाच्या ठिकाण इ.चे परवाने रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल व संबंधित आस्थापना चालकाविरुध्द साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल . सदर आदेशात नमुद संपुर्ण निर्देशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही या बाबी तपासून आवश्यक कायदेशिर व दंडात्मक कारवाई करण्यास खालील यंत्रणेस प्राधिकृत करण्यात येत आहे . 

> महानगरपालिका हद्दीत : - महानगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्त पथके गठीत करावीत 

» नगरपालिका हद्दीत : - नगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्त पथके गठीत करावीत 

» गावपातळीवर : - ग्रामपंचायत व पोलीस विभागाचे संयुक्त पथक गठीत करावे . वरीलप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा ( incident Commander ) यांचेकडे सादर करावीत . संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा ( Incident Commander ) यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्या अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी असेल . 

         सदरील आदेशाचे पालन न करणा - या कोणतीही व्यक्ती , संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८ ९ ७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल . असा आदेश रविवार (दि . ०७.०३.२०२१ ) रोजी माझ्या सही शिक्यानिशी निर्गमित करण्यात येत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , नांदेडचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, भाप्रसे यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News