कोरोनाच्या काळात धाडसाने काम केलेल्या मैत्रिणींना मानाचा मुजरा ; जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा ! -वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नांदेड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, March 7, 2021

कोरोनाच्या काळात धाडसाने काम केलेल्या मैत्रिणींना मानाचा मुजरा ; जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा ! -वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नांदेड




जिल्हा परिषद, नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा ! -संपादक



 कोरोनाच्या काळात धाडसाने काम केलेल्या मैत्रिणींना मानाचा मुजरा ;

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा !

-वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नांदेड



 8 March WOMAN'S DAY Choose to challenge 


नांदेड : आज सोमवार (दि. 8 मार्च) जागतिक महिला दिन. खरं तर या दिवशी आपल्या सगळ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधण्याची प्रबळ इच्छा असूनही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिला मूर्त रूप देणे शक्य होत नाही. आपण सगळ्याजणी कुटुंबात , कार्यालयात, क्षेत्रीय स्तरावर व ज्या व्यवस्थापनात काम करत आहात ते खरंच खूप अभिमानास्पद व अनुकरणीय आहे .      

        जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात उभारी घेण्यासाठी माझ्या सर्व मैत्रिणींना आत्मबळ मिळावं व कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्याची ताकद अंगी बाळगून आपण आपल्या क्षेत्रात भरीव योगदान कराल अशी मी खात्री बाळगते. कोरोनाच्या काळात माझ्या प्रत्येक आशा वर्कर , एएनएम , नर्सेस , अंगणवाडी सेविका , शिक्षिका , ग्रामसेविका कार्यालयीन अधिकारी , कर्मचारी व क्षेत्रीय स्तरावरील माझ्या सर्व लोकप्रतिनिधी मैत्रिणी यांनी जे धाडसाने काम केले त्याला माझा मानाचा मुजरा . महिला दिनाच्या औचित्याने आपणास मनस्वी शुभेच्छा . 

-वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News