*नारीशक्ती खऱ्या अर्थाने जगाची तारणहार -तहसिलदार माधवराव बोथीकर* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, March 11, 2021

*नारीशक्ती खऱ्या अर्थाने जगाची तारणहार -तहसिलदार माधवराव बोथीकर*




उमरी (नांदेड) : जगातील नारी हीच जगाची उद्गाती असून नारीशक्ती हीच जगाची तारणहार आहे,असे प्रतिपादन तहसिलदार माधवराव बोथीकर यांनी केले.

        येथील गटसाधन केंद्रात आयोजित "जागतिक महिला दिन "कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरी पंचायत समितीच्या माजी सभापती पल्लवीताई शिरीषभाऊ गोरठेकर ह्या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या सभापती सावित्राबाई सोनकांबळे, जिल्हा परिषद सदस्या संगिताताई बालाजीराव जाधव, ललिताताई आनंदराव यलमगोंडे, उपसभापती शिरीषभाऊ गोरठेकर, पंचायत समिती सदस्य चक्रधर गुंडेवार, पल्लवीताई मुंगल, आनंदराव यलमगोंडे, बालाजीराव जाधव, विनायकराव मुंगल आदी उपस्थित होते.

        तहसिलदार माधवराव बोथीकर व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.



           कार्यक्रमात तालुक्यातील ४४ महिला शिक्षिकांचा पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

        कोविड -१९ च्या संकट काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य केलेल्या महिला शिक्षिकांचा तहसिलदार बोथीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, शाल , पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

        महिला दिनानिमित्त कांचन चंदापुरे (बोरजुनी), ललिता माधसवाड, श्रीमती देवधर (बितनाळ), रेखा सावळे (चिंचाळा) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपसभापती शिरीषभाऊ गोरठेकर, ललीताताई यलमगोंडे, संगीताताई जाधव यांनीही महिलांच्या वाढत्या गुणवतेबाबत, कार्याबाबत आपले विचार मांडले.

        जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या जागतिक महिला दिनानिमित्त संदेशाचे वाचन गटशिक्षणाधिकारी जी. पी.सोनटक्के यांनी केले. तसेच सर्व महिला शिक्षिका अध्यापन कार्यात अग्रेसर असल्याबाबत गौरव करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सुनंदा चौदंते यांनी केले.

        सदरील कार्यक्रमाचे सुरेख असे नियोजन गटशिक्षणाधिकारी जी.पी.सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी बालाजीराव मोकळे, एस.एल.बेळकोने, कार्यालयीन कर्मचारी टी. यु.पतंगे, प्रमोद नंदेश्वर, अभिनंदन भुरे, मनीषा पगारे, के.सी.भडके, एस.पी.साखरे यांनी केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News