*अक्षर परिवारातील शिक्षिकांचे कार्य प्रेरणादायी* -डॉ दत्तात्रय मठपती - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, March 15, 2021

*अक्षर परिवारातील शिक्षिकांचे कार्य प्रेरणादायी* -डॉ दत्तात्रय मठपती



नांदेड : अक्षर परिवार ही नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक प्रयोगशाळा आहे. येथे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांची अंमलबजावणी जिल्हाभर होत असते. आपण निर्भयपणे परिस्थितीस सामोरे गेले पाहिजे. मी आज जरी उपशिक्षणाधिकारी असलो तरी जो आनंद शिक्षक म्हणून असताना मिळाला तो आज नाही.  शिक्षकी पेशातला आनंद निश्चितच इतर क्षेत्रातील किंवा उच्च पदावरसुद्धा मिळत नाही. अक्षर परिवारातील महिला शिक्षिकांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे असे मत उपशिक्षणाधिकारी डॉ दत्तात्रय मठपती यांनी व्यक्त केले.

         जागतिक महिला दिनानिमित्त वाजेगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी उपसभापती हसीना बेगम, शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड, शिक्षण समिती अध्यक्ष फेरोज शेख, रवी ढगे, शमीमा सुलताना, मुख्याध्यापक बालाजी गाढे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

             या कार्यक्रमात कोरोना काळात ऑफलाइन व ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या ४३ महिला शिक्षिकांना "कोरोना योद्धा नारी सन्मान" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात अक्षर परिवारातील महिलांनी आपल्या कुटुंबाला सांभाळत शाळेतील विद्यार्थ्यांची शिक्षणाची तहान भागवण्याचे कार्य महिला भगिनींनी केलेले आहे त्यामुळे आज महिला दिना निमित्त विभागातील सर्व महिलांचा  सन्मान करण्याचा मानस होता, असे प्रास्ताविकात केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी सांगितले. 



            शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी वाजेगाव विभागातील महिलांच्या उल्लेखनीय कार्याच्या मागोवा घेत, आमच्या भगिनींनी कोरोना काळामध्ये प्रत्यक्ष घरी भेटून मुलांना अभ्यास देत सराव करून घेतला व स्वाध्याय देत मुलांकडून प्रत्यक्ष अनुभव देत अध्ययन निष्पत्तीनुसार अभ्यास करून घेत आहेत याचा निश्चितच मला अभिमान आहे अशी भावना व्यक्त केली.

            बेबीसरोजा परबत, फैमुन्नीसा बेगम, सौ उषा एडके आदींनी आपले मनोगत व्यक्त केले तर पंचायत समितीच्या सदस्य हसीना बेगम शेख फहिम ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख फेरोज, उपाध्यक्ष शमीम सुलताना, सदस्य परवीन बेगम, मुख्याध्यापक बालाजी गाढे, रवी ढगे, सह्याद्री वाहिनीचे प्रतिनिधी भारत होकर्णे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन विभागातील महिलांना गौरवण्यात आले. 



               महिला दिनानिमित्त विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात वाडीपुयड येथील श्रीमती सविता पत्की यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली गोडवजकर यांनी केले तर यशस्वितेसाठी धम्मदीना सोनकांबळे, उषा एडके, पौर्णिमा अंकमवार ,रामेश्वर आळंदे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News