नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा 31 मार्च पर्यंत बंद राहणार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, March 15, 2021

नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा 31 मार्च पर्यंत बंद राहणार

 


नांदेड : नांदेड जिल्ह्यातील  सर्व शाळा दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येत असल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी आज दिली.

 नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे  यांच्याशी शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी आज चर्चा केली.

         कोविड विषाणूंच्या संसर्गात झपाट्याने वाढ होत असल्याने आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी नांदेड यांनी मिशन बिगीन अंतर्गत शाळा बंद करण्यात येत असल्याचे परिपत्रक  आज दि.15 मार्च रोजी जारी केले आहे. 

          शाळा स्तरावर ज्या परीक्षा चालू आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी कोरोना संदर्भात जनजागृती करून नागरिकांमध्ये कुठल्या पद्धतीची घबराट पसरणार  नाही याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.

            विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपापल्या परिसरात, घरात वावरतांना कोविडच्या संदर्भाने सर्व  काळजी घ्यावी. काही लक्षणे आढऴल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News