नांदेड जिल्ह्यात आज 597 व्यक्ती कोरोना बाधित : सहा जणांचा मृत्यू ; सुरक्षितता पाळण्याचे जनतेस आवाहन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, March 17, 2021

नांदेड जिल्ह्यात आज 597 व्यक्ती कोरोना बाधित : सहा जणांचा मृत्यू ; सुरक्षितता पाळण्याचे जनतेस आवाहन

 


नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 87 अहवालापैकी 597 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 355 तर अँटिजेन तपासणीद्वारे 242 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 28 हजार 520 एवढी झाली आहे.

 

सोमवार 15 मार्च 2021 रोजी लेबर कॉलनी नांदेड येथील 58 वर्षाच्या एका पुरुषाचा तर मंगळवार 16 मार्च 2021 रोजी नावघाट नांदेड येथील 45 वर्षाच्या एका महिलेचा, चैतन्यनगर नांदेड येथील 60 वर्षाच्या एका महिलेचा, नायगाव नांदेड येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर बुधवार 17 मार्च 2021 रोजी नंदीग्राम सोसायटी नांदेड येथील 61 वर्षाच्या एका महिलेचा व हाडको नांदेड येथील 81 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 624 एवढी झाली आहे.

 

आजच्या 2 हजार 87 अहवालापैकी 1 हजार 453 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 28 हजार 520 एवढी झाली असून यातील 24 हजार 329 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 343 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 40 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 13, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 153, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 2, धर्माबाद तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 25, मुखेड कोविड रुग्णालय 1, उमरी तालुक्यांतर्गत 5, खाजगी रुग्णालय 15 असे एकूण 217 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 85.30 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 230, अर्धापूर तालुक्यात 12, मुदखेड 9, लोहा 37, देगलूर 6, मुखेड 1, परभणी 5, नांदेड ग्रामीण 22, नायगाव 2, कंधार 1, भोकर 14, हिमायतनगर 13, हिंगोली 1, यवतमाळ 2 असे एकूण 355 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 121, अर्धापूर तालुक्यात 13, देगलूर 8, किनवट 27, हदगाव 4, माहूर 4, मुखेड 6, उमरी 2, नांदेड ग्रामीण 19, भोकर 5, बिलोली 5, धर्माबाद 10, लोहा 9, मुदखेड 7, नायगाव 2 असे एकूण 242 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 3 हजार 343 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 141, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 74, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 78किनवट कोविड रुग्णालयात 58, मुखेड कोविड रुग्णालय 56, देगलूर कोविड रुग्णालय 11, हदगाव कोविड रुग्णालय 17, लोहा कोविड रुग्णालय 62, कंधार कोविड केअर सेंटर 3, महसूल कोविड केअर सेंटर 80, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 915, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 563, खाजगी रुग्णालय 285 आहेत.

 

बुधवार 17 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 40, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 22 एवढी आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 56 हजार 787

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 23 हजार 482

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 28 हजार 520

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 24 हजार 329

एकुण मृत्यू संख्या-624

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 85.30 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-24

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-13

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-311

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3 हजार 343

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-40.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News