*कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांच्या विविध मार्गदर्शक सूचना* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, March 19, 2021

*कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांच्या विविध मार्गदर्शक सूचना*

 



नांदेड (जिमाका) दि. 19 :- राज्यात कोविड-19 संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्‍याने कोविड-19 विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आणि तातडीने काही उपाययोजना करण्यासाठी काही सूचनांचे काटेकोर पालन करण्याबाबत शासनाने निर्देशित केले आहे. यापुर्वी नांदेड जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात कोविड-19 संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढील प्रमाणे विविध मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

सर्व सिनेमागृहे (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्‍लेक्‍सेस) ही खालील प्रतिबंधास अधिन राहून 50 टक्‍के क्षमतेच्‍या अधिन राहून सुरू राहतील. यात मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही . (No Mask - No Entry) 

सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग 

करून शरीराच्या तापमानाची नोंद 

घेण्यात यावी, जेणेकरून ताप 

असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेशदिला जाणार नाही. प्रवेशव्दार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँड 

सॅनिटायझर  ठेवणेत यावीत. सर्व 

आस्थापनामध्ये पुरेशा प्रमाणात 

मनुष्यबळ नियुक्त करावे, जेणेकरून सर्व अभ्यांगताबाबत मास्क परिधान केला जाईल, 

सामाजिक अंतर राखले जाईल 

याविषयी तपासणी केली जाईल. 

या आदेशाचा भंग केल्‍यास संबंधीत सिनेमागृह (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्‍लेक्‍सेस ) ही कोवीड-19  विषाणू  संसर्ग केंद्र सरकारने आपत्‍ती म्‍हणून अधिसूचीत केले असे तोपर्यंत बंद राहतील. तसेच संबंधित आस्‍थापना मालक हे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायद्याअंतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील. 

 

सर्व शाँपीग मॉल्स यांना खालील नमूद प्रतिबंधाचे पालन करणे बंधनकारक असेल. मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही 

(No Mask - No Entry). 

सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग 

करून शरीराच्या तापमानाची नोंद 

घेणेत यावी, जेणेकरून ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशव्दार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँड 

सॅनिटायझर  ठेवणेत यावीत. सर्व 

आस्थापनामध्ये पुरेशा प्रमाणात 

मनुष्यबळ नियुक्त करावे, जेणेकरून सर्व अभ्यांगताबाबत मास्क परिधान केला जाईल, सामाजिक अंतर राखले जाईल याविषयी तपासणी केली जाईल. सर्व मॉल्सचे व्यवस्थापक यांनी 

संबंधित मॉल्समध्ये असलेले थियटर्स व इतर कार्यरत आस्थापना यामध्येही घालणेत आलेल्या प्रतिबंधाचे सदर आस्थापना सुरू करणेपूर्वी तसेच सुरू असताना पालन करत आहेत 

याबाबत दक्षता घेणे. नांदेड जिल्‍ह्यातील सर्व दुकाने सकाळी 7 वा. ते सायंकाळी 5 वा. 

या कालावधीत कोरोना प्रतिबंधक सर्व उपाययोजनांचे पालन करून चालू राहतील, सदर निर्बंध औषधी दुकानांसाठी लागू राहणार नाहीत. सदर आदेशाचा भंग केल्यास, संबंधित शॉपिग मॉल्स ही कोव्हीड-19 विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असे तोपर्यत बंद राहतील. तसेच संबंधित आस्थापना मालक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील.

 

कोणतेही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, सभा, मोर्चे, मिरवणूका,संमेलने तसेच यात्रा, उत्सव,उरुस इत्यादीचे आयोजन करणेस परवानगी असणार नाही. सदर आदेशाचा भंग केल्यास, संबंधित कार्यक्रमाचे आयोजक, जागा मालक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील. तसेच संबंधित सभागृहे, 

इतर ठिकाणे ही कोव्हीड-19 विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असे तोपर्यत बंद 

केली जातील.

 

यापुर्वीच्या आदेशानुसार लग्नसमारंभ व इतर समारंभ हे 16 ते 31 मार्च 2021 या कालावधीत लॉन्‍स, मंगल कार्यालय, हॉल्‍स व अन्‍य तत्‍सम ठिकाणी लग्‍न समारंभ व इतर कार्यक्रम आयोजित करण्‍यास बंदी घालण्‍यात आली आहे. तसेच कोवीड-19 विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता संदर्भ क्र.7 नुसार जिल्‍ह्यातील सर्व प्रकारचे हॉटेल्‍स, परमीट रूम, बेकरी, स्‍वीट मार्ट, चॉट भांडार, ढाबे इ. बाबत आदेश पारीत करण्‍यात आले आहेत.    

 

अंत्‍यविधी / अंत्ययात्रा इत्यादी कार्यक्रमामध्ये सहभागी होणेस फक्त 20 नागरिकांना परवानगी असेल. स्थानिक प्राधिकरण यांनी या अटीचे पालन केले जात असलेबाबत खात्री करावी.   

 

गृह अलगीकरणास पुढील प्रतिबंधास अधिन राहून परवानगी असेल. गृह अलगिकरण झालेल्या नागरिक/ रुग्णांविषयीची माहिती संबंधित स्थानिक प्राधिकरण यांना कळविणे. तसेच तसेच गृह अलगीकरण व्यक्ती ही कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकाच्या (डॉक्टर ) यांचे देखरेखीखाली आहे याची देखील माहिती स्थानिक प्रशासनास देणे बंधनकारक असेल. कोव्हीड -19 रुग्ण असलेल्या ठिकाणी सुरवातीच्या दिवसापासून 14 दिवसापर्यत दर्शनी ठिकाणी फलक लावावा लागेल,जेणेकरून त्या ठिकाणी कोव्हीड-19 रुग्ण असलेची माहिती नागरिकांना होईल. कोव्हीड -19 + Ve रुग्णांच्या हातावर गृह अलगीकरण (Home Quarantine)  असा शिक्का मारणे. सदर कोव्हीड- 19 रुग्ण गृहअलगीकरण केलेल्या ठिकाणी संबंधित कुटुंबातील व्यक्तीनीही कमीत कमी संपर्क ठेवावा. तसेच मास्क परिधान केलेशिवाय सदर ठिकाणी प्रवेश केला जाणार नाही, याविषयी दक्षता घेण्यात यावी. गृह अलगीकरणाची कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झालेस सदर कोव्हीड-19 रुग्ण किंवा अलगीकरण झालेले नागरिक यांना स्थानिक प्रशासनाने सुरु केलेल्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये (CCC) मध्ये स्थंलातरीत केले 

जाईल.

सर्व कार्यालये / आस्थापना ( आरोग्य व इतर अत्यावश्यक असलेल्या आस्थापना वगळता) ही 50 टक्के  क्षमतेच्या  अधिन राहून सुरू राहतील. घरातून काम (Work from home)  करणेबाबत प्रोत्साहित करणे. सदर आदेशाचा भंग केल्यास, संबंधित कार्यालय/आस्थापना व्यवस्थापना ही कोव्हीड-19 विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असेल तोपर्यत बंद राहतील. या ठिकाणी फक्त खालील प्रतिबंधास अनुसरून प्रवेश दिली जाईल याबाबत दक्षता घेणे. मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही 

(No Mask - No Entry). 

सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग करून शरीराच्या तापमानाची नोंद घेणेत यावी, जेणेकरून ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशव्दार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँड सॅनिटायझर  

ठेवण्यात यावीत. सर्व आस्थापनांच्यामध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ 

नियुक्त 

करावे जेणेकरून सर्व अभ्यांगताबाबत मास्क परिधान केला जाईल. 

सामाजिक अंतर राखले जाईल 

याविषयी तपासणी केली जाईल.

 

नांदेड जिल्‍ह्यातील सर्व मंदीर, मस्‍जीद, गुरूद्वारा, गिरीजाघर, बौध्‍दविहार व  इतर धार्मिक स्‍थळे व प्रार्थना स्‍थळे बाबत आदेश पारीत करण्‍यात आले आहेत. यापूर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या व प्रतिबंधित केलेल्याबाबी / क्षेत्रे कायम राहतील आणि यापूर्वी दिलेले आदेश सदर आदेशास संलग्न राहतील आणि सदरचे आदेश दिनांक 31 मार्च 

2021 पर्यंत अस्तित्वात राहतील.

 

सदरील आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व कारवाई करण्‍यात येईल, असे आदेश 19 मार्च 2021 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News