नांदेड : डॉ.बाबासाहेब आंबेडकर अर्बन को. क्रेडीट सोसायटी लि.जिल्हा नांदेडची १३वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
१३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेच्या अध्यक्षा कीर्ती गणपत गायकवाड ह्या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर अर्बन को. क्रेडीट सोसायटी लि.जिल्हा नांदेडच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष बालासाहेब लोणे, प्रवर्तक गणपतराव गायकवाड, पत्रकार सदाशिव गच्चे, उपाध्यक्ष प्रा.दिलीप मुनेश्वर, सचिव प्रा.डॉ.जे.टी.जाधव, संचालक इंजिनिअर दामोधर लोणे, प्रा.डॉ.दिलीप सावंत, डॉ.महेंद्र नरवाडे, कुमारस्वामी माने, संचालिका योगिता बालासाहेब लोणे लहानकर, कलावती जितेंद्र गवळे, सुनिता साहेबराव कांबळे, रेखा किरणकुमार एडके, स्वप्नजा मिलींद जाधव, विशाखा नारायण पाईकराव, सुनंदा संजीव गर्जे, विजयमाला मुकुंद धोत्रे, अनिता आनंद गायकवाड यांच्यासह सर्व संचालक मंडळ व सल्लागार समिती सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विषयसुची प्रमाणे सर्व विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर अर्बन को. क्रेडीट सोसायटी लिमिटेड नांदेडची १३वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या प्रसंगी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे समयोचित भाषण झाले
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अर्बन को. क्रेडीट सोसायटी लि.जिल्हा नांदेडची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी सल्लागार समितीचे सरचिटणीस निलेश गोधने, बबनराव घोडगे, जितेंद्र गवळे, रामदास गोणारकर, साहेबराव कांबळे, किरणकुमार एडके, मिलींद जाधव, नारायण पाईकराव पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रकाश चंद्रे, सह व्यवस्थापक यशवंत हनमंते, लिपिक राजकुमार गायकवाड, सुरेश भालेराव, राजु वाघमारे, प्रशांत दुथडे, कपिल पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.




No comments:
Post a Comment