*नांदेड जिल्ह्यात आज 1 हजार 291 व्यक्ती कोरोना बाधित दहा जणांचा मृत्यू* ▪️अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, March 22, 2021

*नांदेड जिल्ह्यात आज 1 हजार 291 व्यक्ती कोरोना बाधित दहा जणांचा मृत्यू* ▪️अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन

 



नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 61 अहवालापैकी 1 हजार 291 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 771 तर अँटिजेन तपासणीद्वारे 520 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 33 हजार 7 एवढी झाली आहे.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे चैतन्यनगर नांदेड येथील 54 वर्षाची एक महिला, शिवाजीनगर नांदेड येथील 53 वर्षाचा पुरुष, अंबानगर येथील 70 वर्षाची एक महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे राजनगर नांदेड येथील 64 वर्षाचा पुरुष, नांदेड येथील 70 वर्षाचा पुरुष, भाग्यनगर येथील 47 वर्षाची माहिला, खाजगी रुग्णालयात सोमेश कॉलनी येथील 90 वर्षाचा पुरुष, शिवाजीनगर येथील 50 वर्षाचा पुरुष, चैतन्यनगर येथील 68 वर्षाचा पुरुष आणि नांदेड येथील 80 वर्षाच्या एका महिलेचा समावेश आहे. हे मृत्यू दिनांक 20 ते 22 मार्च 2021 या कालावधीत झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 658 एवढी झाली आहे.

 

आजच्या 5 हजार 61 अहवालापैकी 3 हजार 390 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 33 हजार 7 एवढी झाली असून यातील 25 हजार 855 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 6 हजार 264 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 59 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 19, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 305, कंधार तालुक्यांतर्गत 3, माहूर तालुक्यांतर्गत 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 16, हदगाव 1, मुखेड 5, खाजगी रुग्णालय 32 असे एकूण 392 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.33 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 566, भोकर तालुक्यात 11, देगलूर 12, हदगाव 2, कंधार 1, लोहा 36, नायगाव 9, परभणी 4, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 21, बिलोली 5, धर्माबाद 17, हिमायतनगर 14, किनवट 23, मुखेड 33, उमरी 13, यवतमाळ 1, आदिलाबाद 2 असे एकूण 771 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 341, भोकर तालुक्यात 11, धर्माबाद 7, कंधार 7, लोहा 33, मुदखेड 37, नायगाव 6, परभणी 2, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 15, देगलूर 30, हदगाव 3, किनवट 6, माहूर 16, मुखेड 2, लातूर 2, आदिलाबाद 1 असे एकूण 520 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 6 हजार 264 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 188, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 80, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 99, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 15, किनवट कोविड रुग्णालयात 76, मुखेड कोविड रुग्णालय 125, देगलूर कोविड रुग्णालय 19, हदगाव कोविड रुग्णालय 43, लोहा कोविड रुग्णालय 130, कंधार कोविड केअर सेंटर 20, माडवी कोविड केअर सेंटर 7, बारड कोविड केअर सेंटर 4, महसूल कोविड केअर सेंटर 102, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 132, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 112, खाजगी रुग्णालय 375 आहेत.

 

सोमवार 22 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20 एवढी आहे.

 

*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती*

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 76 हजार 352

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 37 हजार 866

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 33 हजार 7

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 25 हजार 855

एकुण मृत्यू संख्या-658

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.33 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-26

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-354

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-329

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-6 हजार 264

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-59.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News