*नांदेड जिल्ह्यात आज 1 हजार 330 व्यक्ती कोरोना बाधित दहा जणांचा मृत्यू* अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, March 23, 2021

*नांदेड जिल्ह्यात आज 1 हजार 330 व्यक्ती कोरोना बाधित दहा जणांचा मृत्यू* अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन

 



नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 473 अहवालापैकी 1 हजार 330 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 699 तर अँटिजेन तपासणीद्वारे 631 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 34 हजार 337 एवढी झाली आहे.

 

रविवार 21 मार्च 2021 रोजी कैलासनगर नांदेड येथील 49 वर्षाच्या एका पुरुषाचा, हदगाव येथील द्रोणागिरीनगर येथील 85 व 48 वर्षाच्या दोन महिलेचा, राज कॉर्नर नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा, मिलत्तनगर नांदेड येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा, लोहा तालुक्यातील बोरगाव येथील 80 वर्षाच्या एका महिलेचा शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर सोमवार 22 मार्च रोजी विनायकनगर नांदेड येथील 72 वर्षाच्या एका महिलेचा व मंगळवार 23 मार्च रोजी हदगाव येथील 79 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर  सोमवार 22 मार्च रोजी राजकॉर्नर नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा, विद्युतनगर नांदेड येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा खासजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.  नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 668 एवढी झाली आहे.

 

आजच्या 5 हजार 473 अहवालापैकी 4 हजार 38 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 34 हजार 337 एवढी झाली असून यातील 26 हजार 293 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 7 हजार 144 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 59 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 10, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 307, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 5, धर्माबाद तालुक्यांतर्गत 5, किनवट कोविड रुग्णालय 7, देगलूर कोविड रुग्णालय 6, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 21, मुखेड 9, माहूर कोविड केअर सेंटर 8, उमरी तालुक्यांतर्गत 20, खाजगी रुग्णालय 40 असे एकूण 438 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.57 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 514, अर्धापूर तालुक्यात 14, बिलोली 2, धर्माबाद 2, हिमायतनगर 1, किनवट 10, मुखेड 34, उमरी 1, हिंगोली 2, नांदेड ग्रामीण 26, भोकर 4, देगलूर 4, हदगाव 36, कंधार 12, लोहा 24, नायगाव 11, परभणी 2 असे एकूण 699 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 374, अर्धापूर तालुक्यात 1, बिलोली 32, धर्माबाद 13, कंधार 7, लोहा 36, मुदखेड 3, नायगाव 8, औरंगाबाद 1, राज्यस्थान 1, परभणी 2, नांदेड ग्रामीण 40, भोकर 1, देगलूर 9, हदगाव 17, किनवट 35, माहूर 11, मुखेड 33, उमरी 5, लातूर 1, हिंगोली 1 असे एकूण 531 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 7 हजार 144 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 226, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 88, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 98, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 31, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 87, मुखेड कोविड रुग्णालय 153, देगलूर कोविड रुग्णालय 52, हदगाव कोविड रुग्णालय 16, लोहा कोविड रुग्णालय 130, कंधार कोविड केअर सेंटर 28, महसूल कोविड केअर सेंटर 126, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 399, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 199, खाजगी रुग्णालय 514 आहेत.

 

मंगळवार 23 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 10, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 40, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20 एवढी आहे.

 

*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.*

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 80 हजार 973

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 40 हजार 879

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 34 हजार 337

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 26 हजार 283

एकुण मृत्यू संख्या-668

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.57 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-79

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-411

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-7 हजार 144

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-59.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News