नांदेड:- महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना शिक्षकांच्या विविध अडचणी विषयी नुकतेच निवेदन देण्यात आले होते.
*त्यात प्राधान्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे शाळा बंद आहेत.*. पण शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था होती. त्यासाठी जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना पुरोगामी शिक्षक संघटनेच्यावतीने निवेदन देऊन लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असताना शिक्षकांना शाळेवर जाण्याची आवश्यकता नाही. ज्यांच्याकडे मोबाईल उपलब्ध आहेत अशा विद्यार्थ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात यावे. अशी मागणी केली होती.
ही मागणी तात्काळ मान्य करून जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांनी शिक्षकांना शाळेत जाण्याची गरज नाही असे पत्रक काढले आहे.
त्याबद्दल पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने राज्य उपाध्यक्ष जी.एस. मंगनाळे , राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे, जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे, शिवशंकर पाटील सोमवंशी, युसुफ शेख, जिल्हा प्रमुख सल्लागार बी टी केंद्रे, अशोक मोरे, बळीराम फाजगे, विनायक कल्याण कस्तुरे , जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश मोकले , जिल्हाप्रमुख संघटक जी.बी.मोरे, रमेश राठोड, रमेश विभुते, दत्ता मुंडे, कविता गरुडकर, शुभदा पेन्शनवार, सुनंदा कल्याणकस्तुरे, अंजुषा श्रीमंगले, श्रीमती वरद यांनी कृतज्ञता व्यक्त केली.




No comments:
Post a Comment