नांदेड : येथील हरहुन्नरी लोककलावंत प्रा. गणेश वनसागर वय (58 वर्षे ) यांचे शुक्रवार (दि.26) रोजी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे.
त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल त्यांना वाहिलेली आदरांजली
*एक हरहुन्नरी कलावंत हरवला *
लोककलावंत गणेश वनसागर यांच्या निधनाची वार्ता समजली आणि मला अफाट दुःख झालं.खरचं माणसाचं आयुष्य कसं आहे..? माणूस माणसं जोडतो.किती प्रांजळ आणि जिव्हाळ्याने राहतो..आणि तो अचानक असा जातो हे मनाला सहन होत नाही..गणेश वनसागर यांची ओळख जवळपास दहा वर्षापूर्वी झालेली आहे..लोकसंवादच्या एका संमेलनात त्यांनी लावणी सादर केली आणि मी त्यांच्या प्रेमातच पडलो..आमची ओळख झाली..भेटी वाढल्या आणि ते माझ्या संचालनाचं कवितेचं खूपच कौतुक करत तुमच्या सारख बोलायचं म्हणत अनेक वेळा माझा कार्यक्रम आकाशवाणीवर ऐकला कि लगेच फोन यायचे..मी त्यांच्या घरी अनेक वेळा गेलो..नृत्त्य करतांना जे शृंगार लागतात. गळ्यातील माळ, हार,कानातले, कमरेचा पट्टा, पायातील पैंजन हे सर्व शृंगार ते घरी साहित्य आणून तयार करीत असत..शृगारी लावणी बैठकिची लावणी आणि भरतनाट्यम् मध्ये त्यांनी खूपच प्राविण्य मिळवलं होतं.बरेच कार्यक्रमात मी त्यांच्या लावणीवर निवेदन करण्यास गेलो होतो.आमच्या गप्पा तासन्तास रंगायच्या मी त्यांची मजाक आणि दिल्लगी खूपच करायचा ..त्यांना ते आवडायची
गणेश वनसागर हे हरहुन्नरी कलावंत होते..त्यांनी साज शृंगार केल्यावर एखादी नटी / हिरोईन फिकी पडावी असा शृंगार आणि अदाकारी त्यांच्यात होती...लावणी / गण / गवळण / भारुड / देशभक्ती पर गित आणि भरतनाट्यम् हे सर्व प्रकार ते अप्रतिम करायचे...
त्याचे भारुट प्रचंड गाजले.."तुला बुरगुंडा होईल बय्या गं..!" हे भिरुड लोकांनी डोक्यावर घेतले...त्यांची अदा आज अगदी डोळ्यासमोर सारखी येत आहे..अनेक वेळा ते शृंगारकेलेले असायचे तर मी त्याच्या जवळ उभ राहून फोटो काढायचा मस्करी करायचा तर...ते मनानं अतिशय मोकळे होते...!!
नेहमी हसत चेहरा आणि प्रामाणिकपणा हा त्यांच्या तील गुण खूप आवडायचा..
गणेश वनसागर यांचं अस अचानक जाणं मनाला हेलावून गेलं...
मी त्यांच्यावर लेख लिहला होता..दै.गोदातिर मध्ये मा.दत्ता डांगे सरांनी त्याला प्रसिद्धी दिली होती..अनेकांचे फोन आले..गणेश वनसागर आणि मीही खूष झालो होतो..!
या हरहुन्नरी कलावंतानं माळेगावची जत्रा अनेकवेळा लोककला सादर करुन गाजवली लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं." वाजले की बारा हा त्यांच्या सादरीकरणाची अफाट उंचीवर नेला होता..!
एवढा मोठा कलावंत माझ्या जवळचा मित्र आहे..आणि तासन् तास बोलायचे..मागेच काँलेजच्या गँदरिंगसाठी त्यांच्याशी बोललो ते..नेहमी म्हणायचे ..कुबडे सर तुम्हाला कधी नाही म्हणूच शकत नाही. तुम्हाला नाही हा शब्दच माझ्याकडून येत नाही...असा तत्पर आणि हजर जवाबी..हरहुन्नरी कलावंत ग्रामीण भागातून आला आणि महाराष्ट्रात प्रसिध्द झाला..त्यांच्या कलेचे कौतुक आणि मेहनतीची प्रसंसा कितीही केली तरी कमीच आहे..असा कलांवत होणे नाही...
कलावंत असून अहम पणाचा जराही लवलेश त्यांच्यात जाणवला नाही..असा कलावंत कधिच मरत नसून अजरामर होत असतो..गणेशवनसागर जरी आपल्यात नसले तरी त्यांची कला आणि त्यांचा सहवास हा कायमच आठवणी आणि मलाना चूटचुट लावणारा सोबत असणार आहे...!
*"मित्रा तू खूप घाई केलीस..!!"*
*-अशोक कुबडे*
नांदेड
9767191303
लावणीचा धनी गेला
आमचे स्नेही बहुजन टायगर युवा फोर्सचे मार्गदर्शक , प्रतिभावंत कलाकार, आपल्या कलेवर खुप खुप प्रेम करणारा सर्व कलाकार यांच्याशी आदराने, सन्मानानं, अत्यंत प्रेमळ मनाने वागणारं लहान मोठ्यांचा आदर करणारा एक जिवलग मित्र प्रा.गणेश वनसागर खुपच मनमिळावु असं व्यक्तीमत्व आज आपल्यातुन निघुन गेलं, आज खरच त्यांच्या लावणी अदाकारी कलेची खुपचं आठवण येते. त्याना बहुजन टायगर युवा फोर्सच्या वतीने झ्यावतीने सर्व कार्यकर्त्यांकडून भावपुर्ण श्रद्धांजली.
-त्रिरत्नकुमार मा.भवरे, कामारीकर,
संस्थापक अध्यक्ष,
बहुजन टायगर युवा फोर्स








No comments:
Post a Comment