महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर : सर्व सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, March 28, 2021

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर : सर्व सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया

 

  



मुबई (सुषेण नरे ) : महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाने राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभे राहिले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांनी प्रशासनाला तशा सुचना दिल्या आहेत. जनतेच्या बेजबाबदार वर्तुनुकिमुळे अनेकदा आरोग्य विषयक सुचनांचे पालन न केल्याने रोगाच्य्या प्रसार झपाटय़ाने होत आहे असे मत विजय महाजन यांनी व्यक्त केले.

      तर टँक्सी व्यवसायिक धर्मेद पंचाल यांनी केवळ रात्रीच्या संचारबंदीला विरोध केला आहे कारण कोरोनाच्या काळात रात्रीच्या वेळी प्रवासी वाहतूक कमीच असते त्यामुळे या संचारबंदीमुळे काही फारसा फरक पडणार नाही असे सांगितले.

       रियल इस्टेट व्यवसायात कार्यरत असलेल्या महेश द्विवेदी यांनी संचारबंदीमुळे नुकताच उभारलेल्या बांधकाम क्षैत्रातील उद्योग अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली. गृहिणी रेणुका मिश्रा यांनी मात्र लाँकडाऊनच्या कृतीचे समर्थन केले यामुळे काही त्रास झाला तरी दुरगामी विचार करता मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले. 

      श्रीनिवास राठोड यांनी जनतेनेच आता स्वतःची काळजी घेऊन आपल्या कुटुंबाची व देशाच्या आरोग्य विषयक सुचनांचे पालन करून आपले रक्षण करण्यासाठी विनंती आहे. तर दिपिका शेट्टी यांच्या मते लसीकरण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे अशी मागणी केली. एकंदरीत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जनतेत पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News