वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी विजय कांबळे यांची ३१ मार्च २०२१ रोजी सेवानिवृत्ती - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, March 30, 2021

वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी विजय कांबळे यांची ३१ मार्च २०२१ रोजी सेवानिवृत्ती

 




नांदेड :नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील जिल्हा क्षयरोग केंद्रातील वरिष्ठ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विजयकुमार परशुराम कांबळे हे वयोमानानुसार दि. ३१ मार्च २०२१ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. 

           सेलू ( जि. परभणी) येथील ग्रामीण रुग्णालय येथून शासकीय सेवेत आलेले विजय कांबळे यांनी उस्मानाबाद येथे काही काळ सेवा केल्यानंतर त्यांनी आदीवासी सारख्या किनवट तालुक्यात अधिकांश सेवा दिली आहे. त्यांच्या पुढाकारामुळेच किनवट सारख्या आदिवासी भागात अनेक रुग्णसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यांच्याच कारकिर्दीत किनवटला रक्त तपासणीची सुविधा सुरु झाली. या सुविधेचा माहूर व किनवट  तालुक्यातील जनतेला विशेषतः आदिवासी रुग्णांना लाभ मिळत आहे. मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद येथे त्यांचे शिक्षण झाल्यामुळे सामाजिक व साहित्यिक चळवळीत सुद्धा ते सदैव अग्रेसर होते. क्रांतिसूर्य व रमा या नाटकात त्यांनी भूमिका वठविल्या. महाराष्ट्राचा महार या ऐतिहासिक नाटकात त्यांनी शूरविर सिद्धनाक यांची मध्यवर्ती भूमिका साकारली होती. ती खूप गाजली. अनेक उपेक्षित कलावंत व समाजधुरिणांना त्यांनी आधार दिला. रुग्णसेवेला जीवन समर्पित करणारे व सध्या नांदेड येथील क्षयरोग जिल्हा केंद्रात वरिष्ठ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत असलेले विजयकुमार परशुराम कांबळे हे दि. ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News