वसंत पांडुरंग घुले यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, March 31, 2021

वसंत पांडुरंग घुले यांचे निधन

 





किनवट : डॉ. आंबेडकरनगर गोकुंदा येथील रहिवाशी निवृत्त शिक्षक वसंत पांडुरंग घुले (वय 75 वर्षे ) यांचे बुधवार (दि. 31 मार्च 2021) रोजी पहाटे 5.30 वाजता निधन झाले.

      त्यांचे पार्थिवावर गोकुंदा येथील स्मशानभूमीत बुधवार (दि. 31 मार्च 2021) रोजी सकाळी 10.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुन, नातवंडं असा परिवार असून विमा प्रतिनिधी तथा शिक्षक  बिंबीसार घुले व तंत्रस्नेही शिक्षक सारंग घुले यांचे ते वडील होत.

        पैनगंगातिरी वसलेल्या टाकळी (वन) या अतिदूर्गम गावाचे मूळरहिवाशी असलेले वसंत घुले यांनी प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेतले. सुमतीबाई हेमसिंग नाईक  कन्या माध्यमिक विद्यालयातून सह शिक्षक म्हणून ते निवृत्त झाले होते. शिक्षण संस्था व पतसंस्थेच्या व्यवहाराचा दांडगा अभ्यास होता. त्यांनी अनेक संस्थांचे अभिलेखे पूर्ण करून दिलेत. तसेच अनेक संस्थांचे आर्थिक अंकेशन करून देण्यास ते सहकार्य करीत असत. अनेक संस्थांचा यशस्वी मार्च एंड करून देणाऱ्या घुले गुरुजींचा मार्च एडंच्याच दिवशी शेवट झाला, हे मनाला चटका लावणारे आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News