*नांदेड जिल्ह्यात 1 हजार 207 व्यक्ती कोरोना बाधित* ▪️26 जणांचा मृत्यू ▪️जनसहयोगातून आरोग्य जागराच्या मोहिमेत सहभाग घ्या - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, April 3, 2021

*नांदेड जिल्ह्यात 1 हजार 207 व्यक्ती कोरोना बाधित* ▪️26 जणांचा मृत्यू ▪️जनसहयोगातून आरोग्य जागराच्या मोहिमेत सहभाग घ्या

 

 


नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 266 अहवालापैकी 1 हजार 207 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 465 तर अँटिजेन तपासणीद्वारे 742 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 46 हजार 483 एवढी झाली असून यातील 34 हजार 649 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 10 हजार 725 रुग्ण उपचार घेत असून 153 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर , सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 31 मार्च ते 2 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 26 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 869 एवढी झाली आहे. दिनांक 31 मार्च रोजी हदगाव कोविड रुग्णालय येथे 60 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालयात नांदेड येथील 61 वर्षाची महिला, दिनांक 1 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे  सिध्दनाथपुरी येथील 44 वर्षाचा पुरुष, लोहा येथील 62 वर्षाची महिला, सिडको येथील 80 वर्षाची महिला, वाळकेवाडी ता. लोहा येथील 62 वर्षाची महिला, सिध्दांत नगर येथील 62 वर्षाची महिला, गुरुद्वारा येथील 63 वर्षाची महिला, मुखेड येथील 80 वर्षाची महिला, उमरी येथील 68 वर्षाचा पुरुष, हनुमानगड येथील 19 वर्षाची महिला, 74 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे जैन मंदिर येथील 55 वर्षीय महिला, लहान येथील 55 वर्षीय महिला, अर्धापूर येथील 51 वर्षीय पुरुष, विनायक नगर येथील 64 वर्षीय महिला, हदगाव येथील 67 वर्षाचा पुरुष, साईबाबा नगर नांदेड येथील 62 वर्षाचा पुरुष, बालाजी नगर येथील 68 वर्षाची महिला, बजाज कॉम्प्लेक्स येथील 60 वर्षाचा पुरुष, मालेगाव येथील 65 वर्षाचा पुरुष, सराफा येथील 42 वर्षाची महिला, कैलास नगर येथील 60 वर्षाची महिला, मुखेड येथील 67 वर्षाचा पुरुष, दिनांक 2 एप्रिल रोजी हदगाव कोविड रुग्णालय येथे 70 वर्षाचा पुरुष, खाजगी रुग्णालयात चौफाळा येथील 46 वर्षीय महिला असे एकूण 26 रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले.

 

आज रोजी 1 हजार 13 बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 6, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण 667, किनवट कोविड रुग्णालय 9, बिलोली तालुक्याअंतर्गत 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 14, उमरी तालुक्याअंतर्गत 17, मुखेड कोविड रुग्णालय 54, अर्धापूर तालुक्याअंतर्गत 10, खाजगी रुग्णालय 112, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 16, हदगाव कोविड रुग्णालय 17, भोकर तालुक्याअंतर्गत 59, माहूर तालुक्याअंतर्गत 4, लातूर येथे संदर्भित 1, नायगाव तालुक्याअंतर्गत 10 असे एकूण 1 हजार 13 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.54 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 235, हदगाव 15, लोहा 34, बिलोली 1, नांदेड ग्रामीण 22, कंधार 10, मुदखेड 38, नायगाव 27, हिमायतनगर 27, अर्धापूर 1, हिंगोली 1, किनवट 33, माहूर 1, मुखेड 15, उस्मानाबाद 1, भोकर 4 असे एकूण 465 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 312, बिलोली 25, हिमायतनगर 4, मुदखेड 50, नांदेड ग्रामीण 13, देगलूर 46, कंधार 22, उमरी 18, अर्धापूर 33, धर्माबाद 8, किनवट 34, मुखेड 90, भोकर 18, लोहा 25, नायगाव 12, माहूर 13, हदगाव 12, परभणी 4, लातूर 3 असे एकूण 742 व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

 

जिल्ह्यात 10 हजार 725 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 239, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 102, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 200, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 130, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 141, मुखेड कोविड रुग्णालय 266, देगलूर कोविड रुग्णालय 47, नायगाव कोविड केअर सेंटर 94, उमरी कोविड केअर सेंटर 37,  माहूर कोविड केअर सेंटर 18, भोकर कोविड केअर सेंटर 23, हदगाव कोविड केअर सेंटर 33, हदगाव कोविड केअर सेंटर 67, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  126, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 7, धर्माबाद कोविड केअर सेंटर 33, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 25, बारड कोविड केअर सेंटर 12, मांडवी कोविड केअर सेंटर 3, नांदेड मनपा अंतर्गत विलगीकरण 5 हजार 838, जैनब हॉस्पीटल कोविड केअर सेंटर देगूलर 78, बिलोली कोविड केअर सेंटर 214, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 782 , खाजगी रुग्णालय 962, कंधार काविड केअर सेंटर 37, महसूल कोविड केअर सेंटर 200 असे 10 हजार 725 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 10, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 7 खाटा उपलब्ध आहेत.

 

*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती*.

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 28 हजार 268

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 74 हजार 984

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 46 हजार 883

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 34 हजार 649

एकुण मृत्यू संख्या-869

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.54 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-35

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-48

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-407

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10 हजार 725

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-153.


 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News