किनवटमध्ये 3 एप्रिल 2021 रोजी 88 बाधितांची भर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, April 3, 2021

किनवटमध्ये 3 एप्रिल 2021 रोजी 88 बाधितांची भर

 



किनवट : शनिवार (दि. 3 एप्रिल 2021) रोजी दुपारी 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार एँटिजेन टेस्ट द्वारे 66 व आरटीपीसीआर टेस्ट द्वारे 22 असे एकूण 88 जण  बाधित आढळले आहेत. 

          बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 181 व होम क्वारंटाईन 126 अशा एकूण 307 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार, भाप्रसे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांचे घर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याचे आदेश इन्सिडंट कमांडर तथा तहसिलदार उत्तम कागणे यांनी काढले आहेत. उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांनी चोख पोलिस बंदोबस्त लावला आहे. जनजागृती कक्षाचे प्रमुख गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांच्या नेतृत्वात बाधित रुग्णांच्या समुपदेशनासाठी शिक्षकांचे पथक नियुक्त करण्यात आले आहेत. तेव्हा जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे  व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.


किनवट तालुका कोरोना संक्षिप्त अहवाल


आरटीपीसीआर टेस्ट,

आज घेतलेले स्वॅब - 54,

आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-22,

स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या -164,

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 0,


ऍन्टिजेन टेस्ट

ऍन्टिजन टेस्ट-297,

आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या-66,

निगेटिव्ह अहवाल-231,


आज रोजी एकुण पॉझिटीव्ह (आरटीपीसीआर + एँटिजेन) रुग्ण- 88,


आज मृत्यू - 0,


होम क्वारंटाईन व रुग्णालयात उपचार घेत असलेले एकूण बाधित व्यक्ती-307 


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News