*नांदेड जिल्ह्यात 1 हजार 650 व्यक्ती कोरोना बाधित* *27 जणांचा मृत्यू तर 1 हजार 330 बाधितांना उपचारानंतर सुट्टी* ▪️जनसहयोगातून आरोग्य जागराच्या मोहिमेत सहभाग घ्या - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, April 9, 2021

*नांदेड जिल्ह्यात 1 हजार 650 व्यक्ती कोरोना बाधित* *27 जणांचा मृत्यू तर 1 हजार 330 बाधितांना उपचारानंतर सुट्टी* ▪️जनसहयोगातून आरोग्य जागराच्या मोहिमेत सहभाग घ्या

 





नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 441 अहवालापैकी 1 हजार 650 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 713 तर अँटिजेन तपासणीद्वारे 937 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 53 हजार 992 एवढी झाली असून यातील 41 हजार 448 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 11 हजार 271 रुग्ण उपचार घेत असून 189 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 5 ते 8 एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 23 एवढी झाली आहे.   दिनांक 5 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे जयभिम नगर येथील 85 वर्षाचा पुरुष, साई नगर नांदेड येथील 50 वर्षीय महिला, नांदेड येथील 76 वर्षीय पुरुष, श्रीनगर नांदेड येथील 65 वर्षीय महिला, गोवर्धन घाट येथील 65 वर्षीय महिला, शिवराय नगर नांदेड येथील 48 वर्षाचा पुरुष, गजानन नगर नांदेड 48 वर्षाचा पुरुष, दिनांक 6 रोजी उदय नगर नांदेड येथील 65 वर्षीय पुरुष, मुखेड कोविड रुग्णालय येथे टाकळी ता. मुखेड येथील 40 वर्षीय पुरुष, दिनांक 7 रोजी मुखेड कोविड रुग्णालय येथे सावरगाववाडी येथील 60 वर्षीय महिला, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथील 45 वर्षीय महिला, किनवट कोविड रुग्णालय येथे आंबेडकरनगर नांदेड येथील 72 वर्षीय महिला, आश्विनी कोविड रुग्णालय येथे तरोडा बु. येथील 58 वर्षीय पुरुष , भगवती कोविड रुग्णालय येथे गांधीनगर बिलोली येथील 75 वर्षीय महिला, भगवती कोविड रुग्णालय उमठाचीवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, आशा कोविड रुग्णालय नांदेड येथील 66 वर्षीय पुरुष, दिनांक 8 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी येथे जुना मोंढा नांदेड येथील 55 वर्षीय पुरुष, आलुवडगाव ता. नायगाव येथील 78 वर्षीय महिला, सिडको नांदेडे येथील 35 वर्षीय पुरुष, उमरी येथील 37 वर्षीय पुरुष, सिडको नांदेड येथील 75 वर्षाचा पुरुष, मुखेड येथील 76 वर्षाचा पुरुष, सोनखेड ता. लोहा येथील 74 वर्षाचा पुरुष, विष्णुपूरी येथील 60 वर्षाची महिला, कारेगाव ता. धर्माबाद येथील 62 वर्षाची महिला, देगलूर येथील 39 वर्षाचा पुरुष, कौठा नांदेड येथील 58 वर्षाचा पुरुष असे एकूण 27 रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले.

 

आज रोजी 1 हजार 330 बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 8, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण 979, कंधार तालुक्याअंतर्गत 2, किनवट कोविड रुग्णालय 11, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत 3, अर्धापूर तालुक्याअंतर्गत 9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 32, मुखेड कोविड रुग्णालय 64, नायगाव तालुक्याअंतर्गत 5, धर्माबाद तालुक्याअंतर्गत 5, देगलूर तालुक्याअंतर्गत 1, खाजगी रुगणालय 130, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 4, हदगाव कोविड रुग्णालय 14, माहूर तालुक्याअंतर्गत  3, बिलोली तालुक्याअंतर्गत  31, लोहा तालुक्याअंतर्गत  29, असे एकूण 1 हजार 330 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.76 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 389, बिलोली 2, कंधार 78, मुदखेड 1, हिंगोली 3, नांदेड ग्रामीण 10, देगलूर 17, किनवट 21, मुखेड 44, परभणी 2, अर्धापूर 13, हदगाव 8, लोहा 16, नायगाव 47, अकोला 1, भोकर 35, हिमायतनगर 19, माहूर 3, यवतमाळ 4 असे एकूण 713 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 335, बिलोली 49, हिमायतनगर 27, माहूर 7, उमरी 17, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 66, देगलूर 41, कंधार 2, मुदखेड 44, यवतमाळ 2, अर्धापूर 27, धर्माबाद 29, किनवट 56, मुखेड 41, लातूर 1, भोकर 56, हदगाव 44, लोहा 43, नायगाव 48, परभणी 1 असे एकूण 937 व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

 

जिल्ह्यात 11 हजार 271 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 243, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 113, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 220, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 146, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 123, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 188, देगलूर कोविड रुग्णालय 53, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 117, बिलोली कोविड केअर सेंटर 312, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 23, नायगाव कोविड केअर सेंटर 151, उमरी कोविड केअर सेंटर 35, माहूर कोविड केअर सेंटर 19, भोकर कोविड केअर सेंटर 20, हदगाव कोविड रुग्णालय 34, हदगाव कोविड केअर सेंटर 69, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 104, कंधार कोविड केअर सेंटर 20, धर्माबाद कोविड केअर सेंटर 98, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 48, बारड कोविड केअर सेंटर 38, मांडवी कोविड केअर सेंटर 12, महसूल कोविड केअर सेंटर 108, एनआरआय कोविड केअर सेंटर 132, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 160, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 643, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 2 हजार 485, खाजगी रुग्णालय 1 हजार 546 असे एकूण 10 हजार 271 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 7, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 6 खाटा उपलब्ध आहेत.

 

*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.*

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 61 हजार 948

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 772

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 53 हजार 992

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 41 हजार 448

एकुण मृत्यू संख्या- 1 हजार 23

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.76 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-28

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-26

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-390

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-11 हजार 271

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-189.


 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News