किनवट : येथून जवळच असलेल्या दराटी (तालुका उमरखेड ) येथील रहिवासी साेमाजी गणपत मुनेश्वर (वय ९२ वर्ष ) यांचे यवतमाळ येथील सरकारी काेवीड केअर सेंटर मध्ये बुधवार (ता.14 एप्रिल ) रोजी पहाटे 3.30 वाजता निधन झाले. आजच सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर उपचार करण्यात येणार आहेत .
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे. विदर्भातील आंबेडकरी चळवळीच्या जुन्या फळीतील ते कार्यकर्ते होते. दराटी येथे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला. क्लिष्ट नियमामुळे सार्वजनिक ठिकाणी पुतळा बसविण्यास परवानगी मिळत नव्हती, तेव्हा त्यांनी स्वतःचा एक प्लॉट पुतळ्या साठी दान दिला होता. प्रख्यात योग तज्ज्ञ देविदास मुनेश्वर, दिलीप मुनेश्वर व गिरिधर मुनेश्वर यांचे ते वडील होतं.




No comments:
Post a Comment