*रोहीदास गच्चे बामणीकर यांचे निधन* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, April 23, 2021

*रोहीदास गच्चे बामणीकर यांचे निधन*

  




नांदेड : नांदेड टेक्सटाईल मिलचे सेवानिवृत्त कर्मचारी रोहीदास गोविंदराव गच्चे बामणीकर यांचे  शुक्रवार (दि.23 एप्रिल) रोजी दुपारी 3:00 वाजता वृद्धापकाळामुळे राहत्या घरी निधन झाले. मृत्युसमयी ते वय 90 वर्षाचे होते. (रोहिदास गच्चे यांना अजिबात कोरोना झालेला नव्हता) त्यांचे पश्चात तीन मुले,एक मुलगी,जावई, नातवंडे आणि राजनगर, स्वप्नजा गार्डन परिसर येथे वास्तव्यास असणारा मोठा परिवार आहे. प्रसिद्ध संगितकार चलचित्रवाणीचे प्रतिनिधी सदाशिव गच्चे व वैचारिक स्तंभलेखक, दैनिक लोकमतचे माजी पत्रकार, केंद्रप्रमुख तथा  जि.प.कें.प्रा.शाळा जांभळा ता.हदगावचे केंद्रीय मुख्याध्यापक मधुकर गच्चे,भगवान गच्चे व शोभा दादाराव बुक्तरे यांचे ते वडील होत.

        त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार ( दिनांक 23 एप्रिल 2021 ) रोजी सायंकाळी 7:00 वाजता गोवर्धनघाट  येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


परिस्थितीवर मात करून शिक्षणाची कास धरणारा कार्यकर्ता गेला


स्मृतिशेष रोहिदास  गच्चे बामणीकर हे अतिशय कष्टाळू, धाडसी, स्वाभिमानी, स्पष्टवक्ते व हिंमतबाज म्हणून सर्वत्र त्यांचा नावलौकीक होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शहरांकडे चला व मोळी विका पण शाळा शिका, दोन घास कमी खा, पण कोणत्याही परिस्थितीत मुलांना उच्च शिक्षण द्या. या संदेशाचा अंगिकार करून व पूर्ण ध्यास घेवून बामणी ता.लोहा येथून मुलांच्या भविष्यासाठी  ते नांदेडला सहकुटुंब स्थलांतरीत झाले. कठीण परिस्थितीचा मुकाबला करत करत मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण व संस्कार देत त्यांनी मुलांना उच्च पदापर्यंत पोंहचविले.

         परिस्थितीवर मात करून शिक्षणाची कास धरणारा कार्यकर्ता गेला. स्मृतिशेष रोहीदास गच्चे बामणीकर यांना इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा)  व डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागरी बँक लि.जिल्हा नांदेडच्या वतीने भावपूर्ण आदरांजली.


-बालासाहेब लोणे

(केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष)

इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) म.राज्य जिल्हा शाखा - नांदेड

9421756489/8975401662

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News