उप जिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे सिटी स्कॅन मशिन व माहुर येथे ऑक्सिजन प्लँटसाठी निधी उपलब्ध करुन द्या ; आ. भीमराव केराम यांची पालकमंत्र्यांकडे मागणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, April 29, 2021

उप जिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे सिटी स्कॅन मशिन व माहुर येथे ऑक्सिजन प्लँटसाठी निधी उपलब्ध करुन द्या ; आ. भीमराव केराम यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

 





किनवट : अदिवासी भागातील सर्व नागरीकांना आरोग्याच्या दृष्टीने सर्व सोयी सुविधा उपलब्ध होऊन दर्जेदार उपचार मिळण्यासाठी किनवट येथील उप जिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे सिटी स्कॅन मशिन व ग्रामीण रुग्णालय माहुर येथे ऑक्सिजन प्लँट उभारणीसाठी तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी  पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.

        सद्यास्थित राज्य व जिल्हयाबरोबर किनवट मतदार संघातील अदिवासी भागात कोरोना विषाणु बाधीत रुग्ण संख्या वाढत असुन ग्रामीण भागातही काविड -19 ने थैमान घातले आहे. या भागात कोरोना विषाणु बाधितांवर उपचार करुन त्यावर नियंत्रण मिळविण्याची आरोग्य विभागाकडुन प्रयत्नांची पराकाष्ठा केल्या जात आहे. परंतु येथे कोरोना स्कोअर तपासणारी उपचार सामग्री सिटी स्कॅन मशिन सुविधा नसल्याने जिल्हास्तरावर सुमारे 150 किमी अंतरावर जाऊन अवाजवी रक्कम सामान्य नागरीकांना मोजावी लागत आहे. यामुळे आजारा बरोबरच आर्थीक संकटाच्या कचाट्यात आलेले सामान्य नागरीक हतबल होत आहेत . 

     तेंव्हा अदिवासी भागातील सर्व नागरीकांना आरोग्याच्या दृष्टीने सर्व सोयी सुविधा उपलब्ध होऊन दर्जेदार उपचार मिळण्यासाठी किनवट येथील उप जिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे एक सिटी स्कॅन मशिन व ग्रामीण रुग्णालय माहुर येथे ऑक्सिजन प्लँट उभारणीसाठी जिल्हा वार्षीक अदिवासी उपयोजना अंतर्गत किनवट / माहुर तालुक्यास आरोग्य सुविधेसाठी तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करुन नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. तसेच याबाबीकडे लक्षवेधनासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी व  एकात्मीक अदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवटचे प्रकल्प अधिकारी यांनाही पत्र दिल आहे. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News