1 हजार 293 कोरोना बाधित झाले बरे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, April 29, 2021

1 हजार 293 कोरोना बाधित झाले बरे

 





*1 हजार 293 कोरोना बाधित झाले बरे नांदेड जिल्ह्यात 816 व्यक्ती कोरोना बाधित*

▪️24 जणांचा मागील दोन दिवसांत मृत्यू

▪️कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 320 अहवालापैकी 816 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 629 तर अँटिजेन तपासणीद्वारे 187 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 79  हजार 517  एवढी झाली असून यातील 66  हजार  307  रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला  11  हजार  416 रुग्ण उपचार घेत असून 187 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 28 ते 29 एप्रिल या दोन दिवसांच्या कालावधीत 24 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 531 एवढी झाली आहे. दिनांक 28 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे नायगाव येथील 45 वर्षाची महिला, बिलोली तालुक्यातील लागुल येथील 38 वर्षाचा पुरुष, मुखेड येथील अनुक्रमे 71 व 33 वर्षाचा पुरुष, किनवट येथील 40 वर्षाचा पुरुष, तरोडा बु. नांदेड येथील 77 वर्षाचा पुरुष,इतवारा नांदेड येथील 50 वर्षाची महिला, विष्णुपुरी नांदेड येथील 67 वर्षाचा पुरुष, तरोडा नांदेड येथील 60 वर्षाचा पुरुष, कंधार तालुक्यातील फुलवळ येथील 57 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे हदगाव येथील 45 वर्षाचा पुरुष, मुखेड तालुक्यातील सारस येथील 37 वर्षाची महिला, नायगाव येथील 65 वर्षाची महिला, खाजी मोहल्ला अर्धापूर येथील 65 वर्षाचा पुरुष, लोहा तालुक्यातील दगडगाव येथील 57 वर्षाचा पुरुष, देगलूर कोविड रुग्णालय येथे मुखेड तालुक्यातील येवती येथील 58 वर्षाची महिला, होट्टल बेस देगलूर येथे 62 वर्षाचा पुरुष, किनवट कोविड रुग्णालय येथे किनवट तालुक्यतील वाडोली येथील 55 वर्षाची महिला, किनवट तालुक्यातील पिंपरुोडी येथील 57 वर्षाची महिला, आधार रुग्णालय येथे नवी आबादी ढोकी नांदेड येथील 62 वर्षाचा पुरुष मेडीकेअर आणि क्रिटीकल केअर सेटर रुग्णालय लोहा येथे लोहा तालुक्यातील पोकरभोसी येथील 60 वर्षाची महिला दि. 29 एप्रिल 2021 रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे भोकर तालुक्यातील दिवशी येथील 60 वर्षाची महिला, देगलूर कोविड रुगणालय येथे सिध्दार्थ नगर देगलूर येथील 71 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.38 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 279, बिलोली 37, हिमायतनगर 10,उमरी 38, हिंगोली 10, औरंगाबाद 1, नांदेड ग्रामीण 22, देगलूर 27, कंधार 22, मुदखेड 22, परभणी 6, अमरावती 1, अर्धापूर 8, धर्माबाद 36, किनवट 6, मुखेड 18, यवतमाळ 4, भोकर 13, हदगाव 14, लोहा 25, नायगाव 26, लातूर 4  असे एकूण 629 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 41, बिलोली 2, माहूर 6, हिमायतनगर 4, कंधार 17, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 6, देगलूर 13, मुदखेड 9, मुखेड 5, हिंगोली 7, लातूर 1, अर्धापूर 3, धर्माबाद 27, किनवट 13, नायगाव 9, परभणी 3, सोलापूर 1, भोकर 3, हदगाव 5, लोहा4, उमरी 3, बोधन 2, पुणे 1  व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 187 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 1 हजार 293 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 20, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 837, धमार्बाद तालुक्यातंर्गत 11, देगलूर कोविड रुग्णालय 4, अर्धापूर तालुक्यातंर्गत 19, उमरी तालुक्यातंर्गत 54, मालेगाव टीसूयु कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 28, मुखेड कोविड रुग्णालय 25, मुदखेड कोविड रुग्णालय 3, , किनवट कोविड रुग्णालय 46, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 11, नायगाव तालुक्यातर्गत 3, खाजगी रुग्णालय 118, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 13, हदगाव कोविड रुग्णालय 10, कंधार तालुक्यातंर्गत 11, माहूर तालुक्यातंर्गत 10, लोहा तालुक्यातंर्गत 61, मांडवी कोविड केअर सेंटर 8  बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .   

 

आज 11 हजार 416 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय 185, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 91, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 164, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 92, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 124, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 116, देगलूर कोविड रुग्णालय 46, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 44, बिलोली कोविड केअर सेंटर 75, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 7, नायगाव कोविड केअर सेंटर 32, उमरी कोविड केअर सेंटर 32, माहूर कोविड केअर सेंटर 22, भोकर कोविड केअर सेंटर 5, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 58, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 60, कंधार कोविड केअर सेंटर 14, धर्माबाद कोविड केअर सेंटर 75 , मुदखेड कोविड केअर सेंटर 15, अर्धापूर कोविड केअर सेंटर 13, बारड कोविड केअर सेंटर 10, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 4, मांडवी कोविड केअर सेंटर 5, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 41, एनआरआय कोविड केअर सेंटर 90, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 33 ,  नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 4 हजार 911, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 3 हजार 48 , खाजगी रुग्णालय 2 हजार 3, हैद्राबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 11 हजार 416 उपचार घेत आहेत. 

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 10, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 34 खाटा उपलब्ध आहेत.

 

*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.*

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 57 हजार 890

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 69 हजार 121

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 79 हजार 517

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 66 हजार 307

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 531

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.38 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-28

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-89

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-404

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 11 हजार 416

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-187


 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News