माहूर किनवटच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तब्बल अकरा रुग्णवाहिका मंजूर... आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नाचे फलित! आमदार भीमराव केराम सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते होणार लोकार्पण! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, April 30, 2021

माहूर किनवटच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तब्बल अकरा रुग्णवाहिका मंजूर... आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नाचे फलित! आमदार भीमराव केराम सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते होणार लोकार्पण!

 

संग्रहित छायाचित्र

किनवट : किनवट-माहुर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मंजूर करून आदिवासी दुर्गम भागातील सामान्य नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने वेळीच उपचार मिळावे या उदात्त हेतूने प्रेरित आमदार भीमराव केराम यांनी गतवर्षी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रारंभी किनवटसाठी तीन आणि आदिवासी उपयोजना अंतर्गत माहूरसाठी तीन रुग्णवाहिका मंजूर करून उपलब्ध करून दिल्या होत्या. माहूर आणि किनवट तालुक्यातील उर्वरित आकरा प्राथमिक आरोग्य केंद्रनाही रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी शासन स्तरावर सतत पाठपुरावा केला होता,त्याचेच फलित म्हणून गुरुवार (ता.२९) रोजी शासन स्तरावरून माहूर आणि किनवट तालुक्यातील आकरा प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका जिल्हा परिषद स्तरावर उपलब्ध झाल्या असून लवकरच त्या माहूर,किनवट तालुक्यातील आरोग्यसेवेसाठी रुजू करण्यात येणार आहेत. 

        रुग्णवाहिका किनवट मध्ये दाखल झाल्यानंतर सोमवार (ता.३ मे)  रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार भीमराव केराम व सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते विधीवत लोकार्पण करून रुग्णसेवेत अर्पण केली जाणार असल्याची माहिती आमदार यांचे जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

        माहूर आणि किनवट तालुक्यातील मागासलेल्या व तसेच अतिदुर्गम व डोंगराळ भागातील पंचायत विस्तार अधिनियम अर्थात पेसा अंतर्गत आदिवासी उपयोजना खालील समाविष्ट गावांमध्ये नागरिकांच्या आरोग्य सुविधेला प्रथम प्राधान्य देत आमदार भीमराव केराम यांनी प्रारंभी पासून ते आजपर्यंत दऱ्याखोऱ्यातील खेडेगावात आरोग्य सुविधा अधिकाधिक कशी बळकट करता येईल या हेतूने प्रेरित आपला स्थानिक विकास निधी व शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीची सांगड घालून अत्याधुनिक दर्जेदार रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर, रेमेडीसिवर इंजेक्शन्स, औषध साठा अत्यावश्यक आरोग्यविषयक साधनसामग्री प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्रापासून माहूर आणि किनवट मधील कोविड केअर सेंटर पर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी शक्य ते सर्व पर्याय वापरून या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या आरोग्यविषयक धोरणाचा परिपाक शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याचे फलित म्हणून आज माहूर आणि किनवट तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सुविधायुक्त आकरा रुग्णवाहिका  माहूर तालुक्यातील इवळेश्वर, आष्टा, सिंदखेड़, दहेली, उमरी (बा.), कोठारी, शिवणी, अप्पारावपेठ, राजगड, बोधड़ी (बु ) व जलधारासाठी राष्ट्रीय आपत्ति व्यवस्थापन योजने अंतर्गत मंजूर झाल्या आहेत. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा परिषदेला उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिका जिल्हा स्तरावरावरून तालुका आरोग्य अधिकारी यांचे मार्फ़त संबधीत ठिकाणी  जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सुपुर्द करावी अशी विनंती आ.केराम यांनी केली आहे. 

        सदर रुग्णवाहिका समाजातील दुर्बल घटक, सामान्य नागरिकांना जीवनदाई ठरणार असल्याने याचा वापर सामान्य जनतेच्या आरोग्य अबाधित राखण्यासाठी करावा असे आवाहनही आमदार भीमराव केराम यांनी केले असून जनतेच्या आरोग्य हितासाठी पहिलेलं स्वप्न साकार झाल्याने आमदार केराम यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालक मंत्री अशोक चव्हाण, सोबतच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांचे आभार व्यक्त केले असुन यापुढेही माहूर आणि किनवट तालुक्यातील डोंगराळ भागातआरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.



 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News