*1 हजार 202 कोरोना बाधित झाले बरे* ▪️नांदेड जिल्ह्यात 518 व्यक्ती कोरोना बाधित ▪️25 जणांचा मागील दोन दिवसांत मृत्यू ▪️कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, May 2, 2021

*1 हजार 202 कोरोना बाधित झाले बरे* ▪️नांदेड जिल्ह्यात 518 व्यक्ती कोरोना बाधित ▪️25 जणांचा मागील दोन दिवसांत मृत्यू ▪️कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन



 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 662 अहवालापैकी 518 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 444  तर अँटिजेन तपासणीद्वारे 74 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 81  हजार 284 एवढी झाली असून यातील 69  हजार  954  रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला  9  हजार  468 रुग्ण उपचार घेत असून 214 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 1 ते 2 मे या दोन दिवसांच्या कालावधीत 25 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 599 एवढी झाली आहे . दिनांक 1 मे, 2021 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे सावरगाव ता. कंधार येथील 68 वर्षाचा पुरुष, कंधार येथील 32 वर्षाचा पुरुष, शिवाजी नगर किनवट येथील 49 वर्षाचा पुरुष, विष्णुपूरी नांदेड येथील 70 वर्षाची महिला, विष्णुपूरी नांदेड येथील 65 वर्षाची महिला, मंदागी ता. देगूलर येथील 25 वर्षाचा पुरुष, नायगाव येथील 50 वर्षाचा पुरुष, देगलूर नाका नांदेड येथील 23 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे भोसी ता. भोकर येथील 65 वर्षाची महिला, कोल्हा ता. मुदखेड येथील 80 वर्षाचा पुरुष, उमरी येथे 78 वर्षाचा पुरुष, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे खडकपुरा नांदेड येथील 60 वर्षाची महिला, किनवट कोविड रुग्णालय येथे दिग्रस ता. किनवट येथील 65 वर्षाची महिला, मुखेड कोविड रुग्णालय येथे परडवाडी ता. मुखेड येथील 60 वर्षाचा पुरुष, नारायणा रुग्णालय येथे विद्या नगर नांदेड येथील 70 पुरुष, भगवती रुग्णालय येथे गुंज नांदेड येथील 65 महिला , अश्विनी रुग्णालय येथे बिलोली येथील 71 वर्षाची महिला, दिनांक 2 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे उमरी ता. हदगाव येथील 70 वर्षाची महिला, बारड ता.मुदखेड येथील 75 वर्षाचा पुरुष, लोण ता. अर्धापूर येथील 60 वर्षाची महिला, भोकर येथील 75 वर्षाची महिला, कंधार येथील 70 वर्षाची महिला, हदगाव कोविड रुग्णालय निवळा ता. हदगाव येथील 65 वर्षाचा महिला, गोदावरी रुग्णालय येथे देशमुख नगर नांदेड येथील 61 वर्षाचा पुरुष, श्री गणेश रुग्णालय सिडको नांदेड येथे सिडको नांदेड येथील 69 वर्षाची महिला यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.6 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे  नांदेड मनपा 120, बिलोली 27, कंधार 21, मुदखेड 12, हिंगोली 6, आदिलाबाद 1, नांदेड ग्रामीण 9, देगलूर 33, किनवट 35, मुखेड 27, यवतमाळ 7, बुलढाणा 1, अर्धापूर 16, धर्माबाद 40, लोहा 24, नायगाव 4, परभणी 2, वाशिम 1, भोकर 21, हदगाव 19, माहूर 8, उमरी 8, लातूर 2  असे एकूण 444 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 16, बिलोली 2, हिमायतनगर 2, माहूर 4, नायगाव 11, नांदेड ग्रामीण 1, देगलूर 2, कंधार 2, मुखेड 2, हिंगोली 3, अर्धापूर 6, धर्माबाद 3, किनवट 3, मुदखेड 3, नागपूर 1, भोकर 1, हदगाव 4, लोहा 7, उमरी 1 व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 74 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 1 हजार 202 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 20, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 576, धमार्बाद तालुक्यातंर्गत 29, देगलूर कोविड रुग्णालय 5, अर्धापूर तालुक्यातंर्गत 23, उमरी तालुक्यातंर्गत 55, मालेगाव टीसीयु कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 10, मुखेड कोविड रुग्णालय 7, नायगाव तालुक्याअंतर्गत 4, किनवट तालुक्याअंतर्गत 131, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत 21, बिलोली तालुक्याअंतर्गत 63, मुदखेड कोविड केअर सेंटर 15, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 30, हदगाव कोविड रुग्णालय 12, कंधार तालुक्यातंर्गत 12, माहूर तालुक्यातंर्गत 8, लोहा तालुक्यातंर्गत 55, खाजगी रुग्णालय 125 बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .   

 

आज 9 हजार 468 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय 163, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 93, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 190, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 47, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 81, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 86, देगलूर कोविड रुग्णालय 37, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 25, बिलोली कोविड केअर सेंटर 103, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 2, नायगाव कोविड केअर सेंटर 25, उमरी कोविड केअर सेंटर 34, माहूर कोविड केअर सेंटर 24, भोकर कोविड केअर सेंटर 5, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 53, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 39, कंधार कोविड केअर सेंटर 17, धर्माबाद कोविड केअर सेंटर 51 , मुदखेड कोविड केअर सेंटर 13, अर्धापूर कोविड केअर सेंटर 20,बारड कोविड केअर सेंटर 22, मांडवी कोविड केअर सेंटर 9, मालेगाव टि.सी.यु. कोविड रुग्णालय 4, भक्ती जंबो कोविड कअर सेंटर 41, एन.आर.आय.कविड केअर सेंटर 55, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 125, नांदेड मनापा अंतर्गत गृह विलगीकरण 3 हजार 837 , नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 2 हजार 543, खाजगी रुग्णालय 1 हजार 724, हैद्राबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 9 हजार 468 उपचार घेत आहेत. 

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 30, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 16,  शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 50, भक्ती जंबो कोविड केअर सेंटर 26 खाटा उपलब्ध आहेत.

 

*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.*

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 66 हजार 12

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 75 हजार 120

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 81 हजार 284

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 69 हजार 954

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 599

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.06 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-113

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-380

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 9 हजार 486

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-214


 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News