खासदार हेमंत पाटील व आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते 11 रुग्णवाहिकांचे लोकार्पण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, May 2, 2021

खासदार हेमंत पाटील व आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते 11 रुग्णवाहिकांचे लोकार्पण

 


किनवट : कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांना त्वरीत उपचार मिळण्याकरिता तातडीने कोविड सेंटर वा तत्सम रुग्णालयात दाखल करण्यासाठी राज्य आपत्ती निधीतून किनवट व माहूर तालुक्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळालेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण खासदार हेमंत पाटील व आमदार भीमराव केराम यांचे हस्ते झाले.

        रविवार (दि.2 मे) रोजी दुपारी 12.30 वाजता येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार भाप्रसे, समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे, तहसीलदार उत्तम कागणे आदी मान्यवरांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.



          राज्य आपत्ती निधीतून राज्यातून 52 रुग्णवाहिका मिळवलेला नांदेड हा पहिला जिल्हा आहे. त्यातून 11 रुग्णवाहिका किनवट उप विभागाला मिळाल्या आहेत. जिल्हा मुख्यालयापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट येथील उप जिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे सीटी स्कॅन मशीन व आरटीपीसीआर तपासणी लॅब उपलब्ध होणेसाठी सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी प्रस्ताव द्यावा, मी स्वतः याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचेकडे पाठपुरावा करेन असे प्रतिपादन हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी लोकार्पण प्रसंगी केले. पुढे बोलताना खासदार हेमंत पाटील असे म्हणाले की, शासनाचा पैसा हा सन्मार्गी लागला पाहिजे, माणूस म्हणून जन्माला आल्याचं आपल्या सत्कृतीतून अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आपण सर्वांनी दाखवून दिलं पाहिजे.  मागील दहा वर्षापासून बंद असलेली आदिवासी बांधवांसाठी जीवनदायी ठरणारी खावटी योजना सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे आभार मानतो. राशनचं धान्य  उपाशीपोटी लोकांच्या पोटात गेलं पाहिजे, इतरत्र जाऊ नये, याकरिता सहायक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार यांनी याकडे लक्ष द्यावे. 



        यावेळी सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी आपल्या मनोगत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने केलेल्या कामांची माहिती दिली.



         यावेळी बोलतांना आमदार भीमराव केराम म्हणाले की, मागील वर्षी आमदार स्थानिक विकास निधीतून 3 व यावर्षीच जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेतून 3 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. आता मिळालेल्या 11 रुग्णवाहिकेने किनवट व माहूर तालुक्यातील 17 प्राथमिक आरोग्य केंद्राचा कोटा फुलफिल झाला आहे. आदिवासी उपयोजनेतून गोकुंद्याच्या डेडीकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरला 36 लाख निधीतून ऑक्सिजन जनरेशन प्लँट उपलब्ध करून घेतला. येथे जम्बो कोविड केअर सेंटर उभारले. यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे अनमोल सहकार्य मिळाले. 



         याप्रसंगी गट विकास अधिकारी सुभाष धनवे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे, डॉ. संदेश राठोड आदीं अधिकारी वर्गासह उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे, दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड, माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमनवार, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, सेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील मुरकुटे, माजी उपसभापती गजानन कोल्हे पाटील, खासदार हेमंत पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड, कपील रेड्डी, गजानन बच्चेवार, प्रकाश कार्लेवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

        नियोजन अधिकारी शंकर साबरे, प्रकाश सिरसाठ, अजमोदीन, लक्ष्मीकांत ओबरे आदिंनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News