नांदेड (जिमाका) :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 612 अहवालापैकी584 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 487 तर अँटिजेन तपासणीद्वारे 97 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 80 हजार 766 एवढी झाली असून यातील 68 हजार 752 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 10 हजार 178 रुग्ण उपचार घेत असून 222 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
दिनांक 29 एप्रिल ते 1 मे या तीन दिवसांच्या कालावधीत 22 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत पावलेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 574 एवढी झाली आहे . दिनांक 29 एप्रिल, 2021 रेाजी लोहा कोविड रुग्णालय हरणवाडी ता. लोहा येथील 70 वर्षाचा पुरुष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे कंधार येथील 47 वर्षाचा पुरुष, भोकर येथील 65 वर्षाचा पुरुष, सिडको नांदेड येथील 60 वर्षाची महिला, कल्याण नगर तरोडा नांदेड येथील 40 वर्षाची महिला, कामठा ता. अर्धापूर येथील 65 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे चिंचाळा ता. बिलोली येथील 46 वर्षाची महिला, जंगमवाडी नांदेड येथील 46 वर्षाची महिला, पिंपळकौठा ता. मुदखेड येथील 70 वर्षाचा पुरुष , पेडी ता. हदगाव येथील 50 वर्षाचा पुरुष, बासवाडी ता.मुखेड येथील 40 वर्षाची महिला, दामगाव ता.मुखेड येथील 50 वर्षाचा पुरुष, तिरुमला रुग्णालय काबरा नगर नांदेड येथील 80 वर्षाचा पुरुष, व्हिजन रुग्णालय येथे रहाटी ता. भोकर येथील 60 वर्षाची महिला, अश्विनी रुग्णालय सैनिक नगर नांदेड येथील 54 वर्षाची महिला, दिनांक 1 मे, 2021 रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटील येथे तामसा रोड अर्धापूर येथील 60 वर्षाचा पुरुष, सिडको नांदेड येथील 88 वर्षाचा पुरुष, पांडूरंग नगर नांदेड येथील 55 वर्षाचा पुरुष, बेंद्री ता. नायगाव येथील 55 वर्षाचा पुरुष. श्रीगणेशा रुग्णालय उगाव ता. देगलूर येथील 55 वर्षाचा परुष, वडार गल्ली ता. मुखेड येथील 55 वर्षाचा पुरुष, निर्मल रुग्णालय येथे निर्मल रुग्णालय नागेली ता. नांदेड येथील 60 वर्षाची महिला, यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.12 टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 154, बिलोली 75, हिमायतनगर 10, मुदखेड 20, हिंगोली 7, नांदेड ग्रामीण 12, देगलूर 25, कंधार 3, मुखेड 3, यवतमाळ 7, अर्धापूर 3, धर्माबाद 2, किनवट 6, नायगाव 63, परभणी 4, भोकर 16, हदगाव 26, लोहा 20, उमरी 29, लातूर 2 असे एकूण 487 बाधित आढळले.
आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 21, बिलोली 2,कंधार 1, मुदखेड 2, हिंगोली 2, नांदेड ग्रामीण 2, देगलूर 10, किनवट 3, मुखेड 3, नंदुरबार 1, अर्धापूर 1, धर्माबाद 12, लोहा 7, नायगाव 9, भोकर 1, हदगाव 6, माहूर 13, उमरी 1 व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 97 बाधित आढळले.
आज जिल्ह्यातील 1 हजार 141 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 8, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 575, धमार्बाद तालुक्यातंर्गत 35, देगलूर कोविड रुग्णालय 27, अर्धापूर तालुक्यातंर्गत 23, उमरी तालुक्यातंर्गत 44, मालेगाव टीसीयु कोविड रुग्णालय 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 15, मुखेड कोविड रुग्णालय 33, नायगाव तालुक्याअंतर्गत 25, किनवट तालुक्याअंतर्गत 38, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत 37, बिलोली तालुक्याअंतर्गत 40, बारड कोविड केअर सेंटर 11, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 5, हदगाव कोविड रुग्णालय 11, कंधार तालुक्यातंर्गत 28, माहूर तालुक्यातंर्गत 26, लोहा तालुक्यातंर्गत 33, खाजगी रुग्णालय 124 बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .
आज 11 हजार 178 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 182, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 86, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 170, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 82, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 98, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 83, देगलूर कोविड रुग्णालय 41,नायगाव कोविड केअर सेंटर 28, उमरी कोविड केअर सेंटर 32, माहूर कोविड केअर सेंटर 24, भोकर कोविड केअर सेंटर 5, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 67, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 50, कंधार कोविड केअर सेंटर 15, बारड कोविड केअर सेंटर 21, मांडवी कोविड केअर सेंटर 5, मालेगाव टि.सी.यु. कोविड रुग्णालय 4, भक्ती जंबो कोविड कअर सेंटर 47, एन.आर.आय.कविड केअर सेंटर 55, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 27, नांदेड मनापा अंतर्गत गृह विलगीकरण 4 हजार 242 , जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 25, बिलोली कोविड केअर सेंटर 87, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 2, धर्माबाद कोविड केअर सेंटर 40 , मुदखेड कोविड केअर सेंटर 17, अर्धापूर कोविड केअर सेंटर 19, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 2 हजार 756, खाजगी रुग्णालय 1 हजार 867, हैद्राबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 10 हजार 178 उपचार घेत आहेत.
आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 24, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 16 शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 38, भक्ती जंबो कोविड केअर सेंटर 20 खाटा उपलब्ध आहेत.
*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.*
एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 63 हजार 351
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 73 हजार 103
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 80 हजार 766
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 68 हजार 752
एकुण मृत्यू संख्या-1 हजार 574
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.12 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-17
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-84
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-379
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 10 हजार 178
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-222




No comments:
Post a Comment