भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून कोविड 19 विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाखांची मदत - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, May 1, 2021

भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून कोविड 19 विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाखांची मदत

 






मुंबई, दि. 1 :- कोविड 19 साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भारतरत्न लता मंगेशकर यांनी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

            कोविड 19 विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड 19 मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे.


मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करण्यासाठीची माहिती खालीलप्रमाणे


इंग्रजीत-

Chief Minister’s Relief Fund-COVID 19


Savings Bank Account number 39239591720


State Bank of India,


Mumbai Main Branch,


Fort Mumbai 400023


Branch Code 00300


IFSC CODE- SBIN0000300



मराठीत-


मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19


बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720


स्टेट बँक ऑफ इंडिया,


मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023


शाखा कोड 00300


आयएफएससी कोड SBIN0000300


 


            सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News