*ऍड.प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस;भिमघाट येथे साजरा* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, May 11, 2021

*ऍड.प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस;भिमघाट येथे साजरा*

 






नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस नांदेड येथील भिमघाटच्या प्रांगणात मोठया  उत्सहात साजरा करण्याची आला.


ऍड.बाळासाहेब आंबेडकर वाढदिवस महोत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचितचे नेते श्याम निलंगेकर हे होते, तर प्रमुख पाहुणे प्राचार्य बाबाराव नरवाडे, संजय वाघमारे, राहुल गजभारे, अनिता भोळे, सचिन नवघडे यांची उपस्थिती होती.



सकाळी नऊ वाजता संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान करण्यात आले,यात यशवंत थोरात, ऍड. नितीन थोरात,पवन जोंधळे, विजय थोरात,रेखा चौदंते,सम्यक खोसले,संदीप सितळे,प्रांजली चौदंते,सुमेध वाघमारे,संदेश चौदंते,सचिन सोनकांबळे, सिद्धांत वाघमारे,भीमराव पैठणे, रोहन कहाळेकर,श्याम निलंगेकर यांनी भाग घेतला.


दुसऱ्या सत्रात आंबेडकर पुतळा परिसरात रोंगोळी स्पर्धा घेण्यात आली.यात लक्ष्मीबाई गजभारे, प्रतिभा गायकवाड, कांताबाई गायकवाड,प्रज्ञा गजभारे,रश्मी निलंगेकर, रुचिका निलंगेकर,रिषिका पंडित, शिलाबाई वाघमारे,कलाबाई  यांनी सहभाग घेतला.


दुपारच्या स्नेह भोजनानंतर लाठी-काठी प्रात्यक्षिक कवायत प्रदर्शन करण्यात आले.

यात लालवाडी येथील ऋषिकेश निलंगेकर,अभय सूर्यवंशी,भूषण वाघमारे,प्रिया वाघमारे यांनी तर,  भिमघाट येथील अंजली पंडित,श्रद्धा जोंधळे,श्रद्धा सोनकांबळे,रिषिका पंडित यांनी सहभाग घेतला.शाहू नगर हडको येथील त्रिरत्न गायकवाड,प्रतीक कांबळे,अनिकेत गवळी,सुमित कांबळे, मिलिंद कांबळे,अनुष्का गर्दनमारे,आरो गर्दनमारे,सारिका कांबळे,संविधान सांगवीकर यांनी भाग घेतला. 



सायंकाळी चार वाजता प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम श्याम निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

यावेळी  प्राचार्य बाबाराव नरवाडे,संजय वाघमारे,कनिष्क सोनसळे,राहुल गजभारे,सचिन नवघडे,प्रतिभा गायकवाड, कांताबाई गायकवाड यांची उपस्थिती होती.


मा.प्रकाश आंबेडकर वाढदिवस महोत्सव समितीचे मुख्यसंयोजक रोहन कहाळेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सम्यक खोसले,संदीप सितळे, प्रज्ञा गजभारे,लक्ष्मीबाई गजभारे, संदेश चौदंते,माधव गायकवाड यांनी प्रयत्न केले,

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News