658 कोरोना बाधित झाले बरे नांदेड जिल्ह्यात 273 व्यक्ती कोरोना बाधित 9 जणांचा मागील तीन दिवसात मृत्यू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, May 15, 2021

658 कोरोना बाधित झाले बरे नांदेड जिल्ह्यात 273 व्यक्ती कोरोना बाधित 9 जणांचा मागील तीन दिवसात मृत्यू

 






नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 994 अहवालापैकी 273 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 209 तर अँटिजेन तपासणीद्वारे 64 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 86 हजार 716 एवढी झाली असून यातील 81 हजार 130 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 3 हजार 426 रुग्ण उपचार घेत असून 130 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 13, 14 व 15 मे 2021 या तीन दिवसाच्या कालावधीत 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 794 एवढी झाली आहे. दिनांक 13 मे 2021 रोजी देगलूर कोविड रुग्णालयात मानसनगर देगलूर येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा, किनवट कोविड रुग्णालयात किनवट तालुक्यात डोंगरगाव येथील 60 वर्षाचा पुरुष, यशश्री कोविड रुग्णालयात हदगाव तालुक्यातील निवघा येथील 63 वर्षाचा पुरुष, दि. 14 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये वाई मुदखेड येथील 65 वर्षाचा पुरुष, वाजेगाव नांदेड येथील 38 वर्षाची महिला, मुखेड कोविड रुग्णालयात नांदगाव येथील 60 वर्षाची महिला, अशा कोविड रुग्णालयात लोहा तालुक्यातील टेळकी येथील 45 वर्षाचा पुरुष, नांदेड येथील 52 वर्षाचा पुरुष तर 15 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये देगलूर तालुक्यातील रुद्रपूर येथील 60 वर्षाची महिलेचा समावेश आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 81, देगलूर 7, कंधार 2, मुदखेड 1, परभणी 6, उस्मानाबाद 1, नांदेड ग्रामीण 4, धर्माबाद 8, किनवट 26, मुखेड 3, बीड 1, अर्धापूर 8, हदगाव 5, लोहा 3, नायगाव 9, तेलंगणा 1, बिलोली 3, हिमायतनगर 14, माहूर 17, हिंगोली 8, यवतमाळ 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे मनपा नांदेड 16, धर्माबाद 1, किनवट 10, उमरी 1, अर्धापूर 2, हदगाव 3, लोहा 3, यवतमाळ 3, बिलोली 1, हिमायतनगर 3, मुखेड 4, हिंगोली 1, देगलूर 10, कंधार 3, नायगाव 3 असे एकूण 273 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 658 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 22, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जंबो कोविड सेंटर 416, मालेगाव टी.सी.यू. कोविड रुग्णालय 1, धर्माबाद तालुक्यांतर्गत 24, बारड कोविड केअर सेंटर 5, देगलूर कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 97,  जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 9, मुखेड कोविड रुग्णालय 3मुदखेड कोविड केअर सेंटर 15किनवट कोविड रुग्णालय 2उमरी तालुक्यातंर्गत 5, बिलोली तालुक्यांतर्गत 8, शासकीय आयर्वेदिक महाविद्यालय नांदेड 4, नायगाव तालुक्यातंर्गत 1हिमायतनगर तालुक्यातंर्गत 17हदगाव कोविड रुग्णालय 3लोहा तालुक्यातंर्गत 2माहूर तालुक्यांतर्गत 22 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 3 हजार 426 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 103, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 60, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 69, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 27, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 53, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 39, देगलूर कोविड रुग्णालय 8, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 22, बिलोली कोविड केअर सेंटर 95, नायगाव कोविड केअर सेंटर 7, उमरी कोविड केअर सेंटर 18, माहूर कोविड केअर सेंटर 13, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 17, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 21, कंधार कोविड केअर सेंटर 6, धर्माबाद कोविड केअर सेंटर 30, मुदखेड कोविड केअर सेंटर 6, अर्धापूर कोविड केअर सेंटर 11, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 10,  बारड कोविड केअर सेंटर 13, मांडवी कोविड केअर सेंटर 1, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 5, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 11, एनआरआय कोविड केअर सेंटर 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 794, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 305, खाजगी रुग्णालय 681 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 59, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 78, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 59, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 96 हजार 583,

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 99 हजार 623

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 86 हजार 716

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 81 हजार 130

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 794

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.55 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-07

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-38

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-230

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 426

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-130

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News