*निधन झालेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, May 19, 2021

*निधन झालेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत*

 


नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यात कोविड व इतर आजाराने 10 माजी सैनिकांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना तातडीची आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून 10 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. माजी सैनिकाच्या पत्नीस  कुटुंब  निवृत्ती वेतन व आर्मीग्रुपचा विमा मिळण्यासाठीचे काम तात्काळ करण्यात येत आहे.  कोविड-19 संसर्गामुळे माजी सैनिकांना कार्यालयात येणे शक्य होत नाही. यामुळे तातडीचे काही काम व अडचणी आल्यास कार्यालयाचे कल्याण संघटक कमलाकर शेटे यांचा मो. 9403069447 यावर संपर्क साधावा, असे  आवाहन नांदेडचे  सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी  केले आहे.

 

मदत वाटप करण्यात आलेल्या कुटुंबियात श्रीमती विमल कावळे, पत्नी स्व. उत्तम गणपतराव कावळे. श्रीमती कल्पना चौदंते स्व कमलाकर चौंदते. पुंडलिक भुसावळे मुलगा स्व श्रीमती रुकमाबाई जगदेवराव भुसावळे. श्रीमती सुशिला राठोड स्व पत्नी भगवान राठोड. श्रीमती  कमल अरविंद पांडे, पत्नी स्व. अरविंद पांडे.श्रीमती  पुष्पा पत्नी स्व रमेश कौठेकर. श्रीमती  इंदू  पत्नी स्व गणेश कदम. श्रीमती प्रीती दगडे पत्नी स्व शंकर लक्ष्मन दगडे. दिपक भक्ते पाल्य श्रीमती जनाबाई सोनबा भक्ते. श्रीमती भारतीबाई पत्नी स्व. बाबुराव पवार यांचा समावेश आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News