*612 कोरोना बाधित झाले बरे* ▪️नांदेड जिल्ह्यात 208 व्यक्ती कोरोना बाधित ▪️6 जणांचा मागील दोन दिवसांत मृत्यू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, May 19, 2021

*612 कोरोना बाधित झाले बरे* ▪️नांदेड जिल्ह्यात 208 व्यक्ती कोरोना बाधित ▪️6 जणांचा मागील दोन दिवसांत मृत्यू

 


नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 443 अहवालापैकी 208 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 135 तर अँटिजेन तपासणीद्वारे 73 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 87 हजार 474 एवढी झाली असून यातील 83 हजार 104 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 2 हजार 138 रुग्ण उपचार घेत असून 95 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 18 व 19 मे 2021 या दोन दिवसांच्या कालावधीत 6 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 830 एवढी झाली आहे. दिनांक 18 मे 2021 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे भोकर येथील 55 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे मुखेड तालुक्यातील दापका येथील 68 वर्षाचा पुरुष, दि. 19 मे 2021 रोजी यशोसाई कोविड रुग्णालय येथे कंधार तालुक्यातील कुरुळा येथील 53 वर्षाचा पुरुष, लोटस कोविड रुग्णालय येथे अर्धापूर येथील 55 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे काबरा नगर येथील 95 वर्षाचा पुरुष, भारत नगर नांदेड येथील 49 वर्षाची महिला यांचा यात समावेश आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 59,बिलोली 4, हिमायतनगर 5, माहूर 3, उमरी 3, नांदेड ग्रामीण 3, देगलूर 1, कंधार 3, मुदखेड 4, हिंगोली 3, अर्धापूर 3, धर्माबाद 2, किनवट 10, मुखेड 4, परभणी 2, भोकर 7, हदगाव 9, लोहा 4, नायगाव 5, बिदर 1  बाधित आढळले तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 15, देगलूर 3,माहूर 8, उमरी 6, अर्धापूर 2, धर्माबाद 1, मुदखेड 21, परभणी 1, किनवट 2, मुखेड 3, बिलोली 4, लोहा 1, नायगाव 3 असे एकूण 208 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 612 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 10, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जंम्बो कोविड सेंटर 376, मुखेड कोविड रुग्णालय 6, धर्माबाद तालुक्यातंर्गत 2, अर्धापूर तालुक्यातंर्गत 20,कंधार तालुक्यांतर्गत 2, मालेगाव टी.सी.यु कोविड रुग्णालय 2,  जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 9,  नायगाव तालुक्यांतर्गत 1, मुदखेड कोविड केअर सेटर 10, माहूर तालुक्यातर्गंत 14, उमरी तालुक्यातर्गंत 4, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 8, देगलूर कोविड रुग्णालय 4, हिमायतनगर तालुक्यातर्गंत 12, किनवट कोविड रुग्णालय 2, लोहा तालुक्यातर्गंत 13, खाजगी रुग्णालय 95 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 2 हजार 138 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 84, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 50, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 55, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 3, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 40, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 23, देगलूर कोविड रुग्णालय 8, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 16, बिलोली कोविड केअर सेंटर 28, नायगाव कोविड केअर सेंटर 9, उमरी कोविड केअर सेंटर 12, माहूर कोविड केअर सेंटर 15, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 17, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 14, धर्माबाद कोविड केअर सेंटर 30, मुदखेड कोविड केअर सेंटर 9, अर्धापूर कोविड केअर सेंटर 7, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 3, एनआरआय कोविड केअर सेंटर 17, बारड कोविड केअर सेंटर 11, मांडवी कोविड केअर सेंटर 2, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 1, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 202, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 78, खाजगी रुग्णालय 397 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 71, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 91, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 80, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत.

 

*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.*

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 4 हजार 369

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 6 हजार 515

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 87 हजार 474

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 83 हजार 104

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 830

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.00 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-35

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-238

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 138

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-95


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News