नांदेड :श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित सावित्रीबाई फुले हायस्कूल बाबानगर या प्रशालेच्या मुख्याध्यापकपदी इंग्रजी विषयाचे ज्येष्ठ अध्यापक पी. जी. शिरपूरकर यांची पदोन्नती आणि नियुक्ती करण्यात आली आहे.
पर्यावरणवादी आणि पक्षीमित्र अशीही ओळख असलेले पी. जी. शिरपूरकर यांनी २७ वर्षे महात्मा फुले हायस्कूल बाबानगर शाळेत असंख्य विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे ज्ञानदान केले. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी ते सदोदीत धडपडत असतात.
गेल्या चार वर्षांपासून ते संस्थेच्या सिडको येथील इंदिरा गांधी हायस्कूल येथे पर्यवेक्षक आणि उपमुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. अलिकडेच शारदा भवन संस्थेच्या कार्यकारीणीच्या बैठकीत त्यांच्या मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्याचा ठराव संमत करण्यात आला. दिनांक १ आॕगस्टपासून ते सावित्रीबाई फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक असतील.
किनवट आणि इस्लापूर सारख्या दूर्गम भागात निसर्ग मित्रमंडळ तसेच वनखात्याच्या सहकार्याने शिरपूरकर सर यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेकवेळा जंगल कँपचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांना निसर्गाची जवळून ओळख व्हावी तसेच स्थानिक आणि स्थलांतरीत पक्ष्यांचे ज्ञान व्हावे या साठी अभिनव उपक्रम राबवले. अनेक मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात सकारात्मक भर घातली. इंग्रजी सामान्यज्ञान परीक्षा हा उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. पी. जी. शिरपूरकर यांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचे स्नेही मित्र आणि सहकारी यांच्याकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.




No comments:
Post a Comment