किनवट : येथील बळीराम पाटील महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख प्रा. उमाकांत इंगोले यांना प्रदीर्घ सवेनंतर शनिवार (दि.31) रोजी निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. के. बेंबरेकर हे होते. यावेळी सत्यशोधकिय विचारवंत प्रा.रामप्रसाद तौर, उपप्राचार्य डॉ. जी. एस .वानखेडे, पर्यवेक्षक प्रा.अनिल पाटील यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
सत्कार मुर्तींचा शाल, श्रीफळ व पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एस.के. बेंबरेकर यांनी यु.जी इंगोले यांच्या महाविद्यालयातील गणित व विज्ञान शाखेतील कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना शुभेच्छा दिल्या. गणित तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून त्यांचा नावलौकिक असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
या प्रसंगी सत्कार मूर्ती यु.जी. इंगोले यांनी आपल्या सेवेबद्दल व महाविद्यालयाच्या विकासा संदर्भामध्ये गणित विभागाची कामगिरी विषद केली.या प्रसंगी सत्कार मूर्ती इंगोले यांचा सत्कार रासेयो सल्लागार प्रा. डॉ. अनंद भालेराव, डॉ. जी.बी. लांब, प्रा. राजकुमार नेम्मानीवार, प्रा.विजय खुपसे, ग्रंथपाल प्रा.मंदाकिनी राठोड, कार्यालय कर्मचारी आशाताई शिरपूरकर यांनी केला.
कार्यक्रम आय.क्यू.ए.सी.विभाग प्रमुख डॉ. एस.आर. शिंदे, रासेयो कार्यक्रम आधिकारी प्रा. माने शेषराव,वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ. शुभांगी दिवे, डॉ पी. डी. घोडवाडीकर, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा . सुलोचना जाधव, प्रा.एम.आय. पवार, प्रा. पुरुषोत्तम येरडलावार, प्रा.डॉ. लता पेंडलवार आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद लोकडे, लक्ष्मीबाई , सुधीर पाटील यांनी प्रयत्नकेले. प्रा.डॉ.पंजाब शेरे यांनी सूत्रसंचलन केले.




No comments:
Post a Comment