नांदेड,31: नांदेड जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत गट-क व गट-ड कर्मचा-यांच्या सार्वत्रिक बदली प्रक्रियेच्या शेवटच्या दिवसी सामान्य प्रशासन विभागाच्या समुपदेशनाव्दारे बदल्या करण्यात आल्या. यात 92 अधिकारी-कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सहाय्यक प्रशासन अधिकारी पदाच्या दोन बदल्या प्रशासकीय कारणावरून करण्यात आल्या. कनिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी संवर्गात 7 बदल्या झाल्या असून यात 3 प्रशासकीय व 4 विनंतीवरुन बदल्या झाल्या. वरिष्ठ सहाय्यक या पदाच्या 18 बदल्या झाल्या असून प्रशासकीय 6 तर विनंतीच्या 12 बदल्या आहेत तर कनिष्ठ सहाय्यक पदाच्या 62 बदल्या झाल्या असून यामध्ये प्रशासकीय 28 तर विनंतीवरून 37 बदल्यांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती पद्मा नरसारेड्डी सतपलवार, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, समाजकल्याण सभापती अॅड. रामराव नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे आदींची उपस्थिती होती.




No comments:
Post a Comment