कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच राज्यात ४४१ वसतीगृहांपैकी ४३५ वसतीगृहे सुरू -धनंजय मुंडे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, March 21, 2022

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच राज्यात ४४१ वसतीगृहांपैकी ४३५ वसतीगृहे सुरू -धनंजय मुंडे

 




मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)  : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच सामाजिक न्याय विभागांतर्गत येणारी ४४१ पैकी ४३५ वसतीगृहे सुरू करण्यात आली आहेत उर्वरीत वसतीगृह सुरू करण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

           राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी वसतीगृहे बंद असल्याबाबत विधानसभा सदस्य मंगेश चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सर्वश्री सदस्य संजय सावकारे, संग्राम धोपटे, अभिमन्यू पवार यांनी या प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चेत सहभाग घेतला.

         मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच ४४१ पैकी ४३५ वसतीगृहे सुरू करण्यात आली आहेत. उर्वरीत वसतीगृह काही कारणास्तव बंद आहेत काही ठिकाणी बांधकामे पूर्ण नाहीत तसेच ज्या अडचणी आहेत त्यावर मार्ग काढून लवकरात लवकर वसतीगृहांची बांधकामे पूर्ण करणार आहे.  तसेच सामाजिक न्याय विभागाकडून नियोजित असलेली वसतीगृहाची बांधकामेदेखील वेळेत पूर्ण करणार असल्याचे सांगितले.वसतीगृहाला जाणारे रस्ते दर्जेदार करणार असून भाड्याच्या इमारतीत असलेल्या वसतीगृहांचाही प्रश्न सोडविणार असल्याचे मंत्री श्री मुंडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News