*विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक देणाऱ्या शाळांविरूद्ध* *शालेय शिक्षण विभागाची कार्यवाही* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, April 5, 2022

*विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक देणाऱ्या शाळांविरूद्ध* *शालेय शिक्षण विभागाची कार्यवाही*

 



मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे) : कांदिवली पश्चिम येथील कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूल तसेच पुण्याच्या उंड्री येथील युरो स्कूलमध्ये फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक दिली जात होती. त्यांना वर्गाबाहेर उभे केले जात असे. तसेच इतर विद्यार्थ्यांसमोर अपमानित करून मानसिक त्रास दिला जात असे. अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याने शालेय शिक्षण विभागामार्फत याची तातडीने दखल घेण्यात येऊन कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य रेशमा हेगडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, युरो स्कूलबाबत उपसंचालक पुणे यांनी भेट देऊन चौकशी केली असून शाळेला नोटीस देण्यात आली आहे.


         कोविड-19 संदर्भातील निर्बंधांमुळे यावर्षी शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात आला. कोविड मुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. या काळात शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी काही विद्यार्थ्यांना विलंब झाला. ही एकंदरीत परिस्थिती विचारात घेऊन विद्यार्थ्यांना मानसिक दृष्ट्या आधार द्यावा तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले होते. विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक देणे, वर्गाबाहेर उभे करणे, मानसिक त्रास देणे, त्यांचे शैक्षणिक नुकसान होईल अशी कृती करणाऱ्या शाळांची गय न करता त्यांच्याविरूद्ध कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते, त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.


*विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या त्रास देणाऱ्या अथवा त्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या शैक्षणिक संस्थांची गय केली जाणार नाही

-शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News