वाघं जवळून पहायचे ? तर ६ मे पासून पैनगंगा अभयारण्यातील खरबी सफारी प्रवेशद्वारातून निसर्गपर्यटन सुरु होतेय - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, May 5, 2022

वाघं जवळून पहायचे ? तर ६ मे पासून पैनगंगा अभयारण्यातील खरबी सफारी प्रवेशद्वारातून निसर्गपर्यटन सुरु होतेय

  



किनवट : येथून जवळच असलेल्या पैनगंगा ( वन्यजीव ) अभयारण्य क्षेत्रातील खरबी वनपरिक्षेत्रात खरबी सफारी गेट येथून ता .०६ मे २०२२ पासून निसर्ग प्रेमींच्या मागणीवरून निसर्ग पर्यटन सुरु करण्यात येत आहे .    


         पैनगंगा ( वन्यजीव ) अभयारण्याच्या खरबी वनपरिक्षेत्रात वाघ , बिबट , अस्वल , लांडगा , रानकुत्रे , तरस , चितळ , सांबर , चौसिंगा , भेकर , काळवीट इत्यादी सोबतच विविध पशुपक्षी इत्यादीचा मोठ्याप्रमाणात वावर असून जंगल जैवविविधतेने समृद्ध असल्याने पर्यटकांच्या मागणीनुसार क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती ज्योती बॅनर्जी  तसेच विभागीय वन अधिकारी ( वन्यजीव )  पांढरकवडा किरण जगताप व सहाय्यक वनसंरक्षक  ( वन्यजीव )  पैनगंगा अभयारण्य उमरखेड रवींद्र कोंडावार यांचे मार्गदर्शनाखाली ता . ०६ मे २०२२ पासून खरबी सफारी गेट पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असून त्याचे बुकिंग क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांच्या नियंत्रणाखाली ऑनलाईन पद्धतीने www.magicalmelghat.in या संकेस्थळावर सुरु करण्यात आले आहे . 

       सदर प्रवेशद्वारावरून दररोज सकाळी वेळ ०५:३० ते ० ९ : ३० सात वाहने व दुपारी वेळ ३:०० ते ०६:३० यावेळेत सात वाहने दररोज सफारी करिता सोडण्यात येतील . तसेच गर्दीच्या एप्रिल मे व जून या कालावधीत दोन ऑफलाईन वाहने असे एकूण सोळा वाहने सोडण्यात येतील . पैनगंगा ( वन्यजीव ) अभयारण्य मराठवाडा व विदर्भाचा सीमेवर असून लागुनच तेलंगना या राज्याची सीमा असल्याने सदर प्रवेशद्वार किनवट , नांदेड , यवतमाळ , औरंगाबाद , नागपूर , आदिलाबाद व हैद्राबाद येथील पर्यटकांसाठी नांदी ठरणार आहे .

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News