*टिळक भवन येथे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा जनता दरबार संपन्न!* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Thursday, May 12, 2022

*टिळक भवन येथे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा जनता दरबार संपन्न!*मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न, अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर राहिला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांचे जनता दरबार पुन्हा सुरु करण्यात आले आहेत.


        गुरुवार (ता. 12 ) रोजी सकाळी 11 वा. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर येथे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा जनता दरबार संपन्न झाला. शिक्षण विभागाशी संबंधित सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी ऐकून घेतले त्यावर तात्काळ कार्यवाही करून ते प्रश्न सोडवण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुभाष कानडे, सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस देवानंद पवार, चंद्रकांत पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संतोष केणे, समन्वयक रविंद्र परटोले उपस्थित होते.No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News