तृतीय पंथीयांना तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या हस्ते राशनकार्ड वाटप - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Wednesday, May 11, 2022

तृतीय पंथीयांना तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या हस्ते राशनकार्ड वाटप

 


किनवट : येथील तृतीय पंथी यांना तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या हस्ते राशनकार्ड वाटप करण्यात आले. यावेळी पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार मोहम्मद रफिक व मास्टर ट्रेनर मल्लिकार्जुन स्वामी, जळमकर व मनोज कांबळे उपस्थित होते.

         गंगानगर येथील रहिवाशी जयश्री पूजा बकस (वय 26 वर्षे ) , सुभाषनगर येथील रहिवाशी साक्षी प्रकाश सरवदे (वय 26 वर्षे ) व ज्युलि किशन सूर्यवंशी ( वय 27 वर्षे ) यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकरण एच. पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली मास्टर ट्रेनर मल्लिकार्जुन स्वामी , जळमकर व मनोज कांबळे यांनी यापूर्वीच त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली आहेत. टाळेबंदीत आमची खूप ससेहोलपट झाली. घराबाहेर पडता येईना अन् कोरोनाच्या भितीने कुणी जेवनही देईना. परंतु तहसिल प्रशासनाच्या वतीने आम्हाला आता राशनकार्ड मिळाले आहे. तेव्हा आम्हाला हक्काचं राशन मिळणार आहे. याबद्दल आम्ही तहसिल प्रशासनाचे आभार मानतो. असे या तृतीय पंथीयांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News