*महा अजिविक अभियानांतर्गत अर्धापुर येथे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थिती बँक कर्ज मेळावा संपन्न* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, June 2, 2022

*महा अजिविक अभियानांतर्गत अर्धापुर येथे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थिती बँक कर्ज मेळावा संपन्न*

 



अर्धापुर (नांदेड) : येथील रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत स्वयं सहायता समूह कर्ज वाटप मेळाव्यामध्ये आठ  समूहांना प्रत्येकी दोन लक्ष रुपये कर्ज वाटप करण्यात आले .या कर्ज वाटप मेळाव्यास माननीय जिल्हाधिकारी डॉ.वीपीन ईटनकर यांनी स्वतः उपस्थित राहून प्रतिनिधिक स्वरूपात काही महिलांना चेक वितरित केला.

       महिलांसोबत संवाद साधून त्यांना योग्य असे मार्गदर्शन केले व महिलांचा उत्साह द्विगुणीत केला. त्यांच्यासोबत उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी , तसेच लीड  बँक अधिकारी अनिल गचके, शाखा व्यवस्थापक अनिल घुगल , तालुका अभियान कक्षाचे थोरात , चंदेल, लोहकरे विनोद , कुलकर्णी तसेच बँक सखी श्रीमती मोतेवार आणि समूह संसाधन व्यक्ती सागर सरपाते  उपस्थित होते. पिंपळगाव आणि दिग्रस नांदला येथील स्वयंसहायता समूहाच्या सर्व महिला देखील उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News