किनवट : येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयात 80 व्या स्वातंत्र्य दिना निमित्त सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी बी. सरवनन, भाप्रसे यांचे हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. तालुक्यात व शहरात विविध ठिकाणी अनेक उपक्रम राबवून स्वातंत्र्य दिन हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.
यावेळी आमदार भीमराव केराम, नगराध्यक्ष सुजाता एंड्रलवार, तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर, उप विभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम, पोलिस निरीक्षक गणेश कराड , गट शिक्षणाधिकारी निळकंठ चेटले , नायब तहसीलदार मोहम्मद रफिक , रामेश्वर मुंडे , चंद्रशेख सहारे , बालाजी फोले , निलेश राठोड, आदिवासी सेवक नारायण सिडाम , माजी नगराध्यक्ष इसाखान, के. मूर्ती, आनंद मच्चेवार, साजीद खान, आदी मान्यवरांसह माजी सैनिक बळीराम कुडमेथे , तुकाराम माशीदवार , अशोक सिडाम , साहेबराव चव्हाण , श्रीराम भरकाडे , अखविंद भवरे , इंगोले, अ.भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा माजी सैनिक प्रमोद पोहरकर उपस्थित होते.
प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी पुष्पापूर्ण वंदन केले. ध्वजारोहणापूर्वी 150 वर्षे झालेले वंदे मातरम् राष्ट्रीय गान गाईले. ध्वजारोहणानंतर स्वरनिनाद संगीत क्लास गोकुंद्दाच्या संस्थापिका संगीत विशारद आम्रपाली वाठोरे- कांबळे यांनी त्यांची विद्यार्थिनी इशिता पत्की (संवादिनी वादनासह) , प्रज्योत कांबळे यांच्या तबला साथीने राष्ट्रगीत , महाराष्ट्र राज्यगीत व देशभक्ती गीते सादर केली. याप्रसंगी पोलिस उप निरीक्षक नितेश लेनगुळे यांच्या नेतृत्वात पोलीस दलाच्या वतीने मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. तसेच सेकंड ऑफिसर ज्ञानेश्वर कदम यांच्या नेतृत्वात महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय गोकुंदा येथील एन. सी.सी. ट्रूपच्या वतीने मान्यवरांन गार्ड ऑफ ऑनर ( सशस्त्र मानवंदना) देण्यात आली. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. राम बुसमवार यांनी आभार मानले.
यावेळी स्वातंत्रय सैनिकाच्या वारस मुक्ताबाई निवृत्ती सावते यांचा व इयत्ता 10 वी परिक्षेत 100 % गुण घेऊन लातूर बोर्डातून प्रथम आलेल्या इशिता पत्की यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
पुरात वाहून गेलेल्या राजूच्या वारसास मान्यवरांच्या हस्ते चार लाख रुपयाचा धनादेश वाटप
तसेच पुरात वाहून गेलेल्या कंचली येथील राजू रेड्डी दंडेलू यांच्या वारस पत्नी ज्योती राजू दंडेलू , त्यांच्या दोन मुली 4 वर्षाची नंदिनी व 10 महिन्याची साक्षी यांना चार लाख रुपयाचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरात पोहून राजूचा मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढणारे मलकजाम येथील भोई समाजाचे संतोष बोरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर , पंचायत समिती कार्यालयात गट विकास अधिकारी जयश्री वाघमारे व गट शिक्षणाधिकारी कार्यालयात गट शिक्षणाधिकारी निळकंठ चेटले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.







No comments:
Post a Comment