वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण कालमर्यादा वाढवून देण्याचे शिक्षण सचिवांकडून मान्य #शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची भेट - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, July 10, 2022

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण कालमर्यादा वाढवून देण्याचे शिक्षण सचिवांकडून मान्य #शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची भेट

 



मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद शिष्टमंडळाने शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांची भेट घेतली. त्यात वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण शाळा सुरू झाल्यानंतर सुरू झाल्यामुळे दैनंदिन अध्यापनातून ,तसेच  सेतू अभ्यास त्यामुळे ट्रेनिंग पूर्ण करण्यात उशीर होत आहे त्यामुळे पुढील दोन महिने वरिष्ठ व निवड श्रेणी चे प्रशिक्षण कालावधी वाढविण्याची मागणी शिक्षक परिषदेकडून करण्यात आली ती मागणी शालेय शिक्षण प्रधान सचिवांनी तात्काळ मान्य केली.


शिक्षण सचिवांची आज मंत्रालयात त्यांच्या दालनात शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली त्यावेळी परिषदेचे अध्यक्ष वेनुनाथ कडू,  मुंबई कार्यवाहक शिवनाथ दराडे, रात्र शाळा संयोजक निरंजन गिरी, संतोष धावडे, ज्ञानेश्वर पवार आदी परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सोबत होते.


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी देशभर साजरा केला जाणार असून यावर्षी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेमार्फत भारत माता पूजन व क्रांतिकारकांच्या जीवनपट/ कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एक ऑगस्ट 2022 रोजी हा जनजागरण दिवस साजरा करण्यात  येणार आहे. त्यासाठी या राष्ट्रीय कार्यक्रमास शासनाने सहकार्य करावे, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली, त्यासाठी प्रधान सचिवांना त्यांच्या दालनात जाऊन परिषदेच्या शिष्टमंडळाने सविस्तर निवेदन दिले. त्यावर शिक्षण सचिव देओल यांनी  यावर शासन सकारात्मक असेल असे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News