गोदावरी अर्बन सहकार क्षेत्रातील हायटेक संस्था -पाशा पटेल #गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्य मुख्यालयास भेट - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, August 6, 2022

गोदावरी अर्बन सहकार क्षेत्रातील हायटेक संस्था -पाशा पटेल #गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्य मुख्यालयास भेट

 


नांदेड, ता.६ :  सहकार क्षेत्रात अनेक संस्था आहेत. परंतू संस्था सुरु करण्यामागचा अनेकांचा हेतू स्पष्ट नसतो. या उलट खासदार हेमंत पाटील व राजश्री पाटील यांनी सुरु केलेल्या गोदावरी अर्बन संस्थेचा पाच राज्यात झालेला विस्तार बघून त्यांचा सामान्य व्यक्तीस सहकारातून मदतीचा हात देण्याचा उद्देश अगदीच स्पष्ट दिसून येतो. यामुळे गोदावरी अर्बन हि सहकार क्षेत्रात अल्पावधितच राज्यातीलच नव्हे परराज्यातील सामान्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली एकमेव हायटेक संस्था असल्याचे कृषी मुल्य आयोगाचे माजी सदस्य पाशा पटेल यांनी म्हटले आहे. 

     सध्या नांदेड दौऱ्यावर असलेले पाशा पटेल यांनी शनिवारी (ता.सहा) तरोडा नाका परिसरातील गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्य  मुख्यालयास भेट दिली. यावेळी गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी श्री पटेल यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. सोबतच बँक आफ महाराष्ट्र लातूर शाखेचे चिफमॅनेजर बिझनेस हेड मार्केटिंग नितीन श्रोत्री, बिझनेस डेव्हलमेंट आफिसर सोहम खरात, शिवसेनेचे प्रल्हाद इंगोले यांची उपस्थिती होती. दरम्यान पाशा पटेल यांनी सहकारसूर्य मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधत संस्थेच्या हायटेक कामकाजाविषयी माहिती जाणून घेत असतानाच खासदार हेमंत पाटील व राजश्री पाटील यांनी मुहूर्त मेढा रोवलेल्या गोदावरी अर्बन सहकारी संस्थेला सहकार क्षेत्रात वेगळ्या उंचीवर नेऊन जाण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे गोदावरी अर्बन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या कार्याचे विशेष कौतुक करायला ते विसरले नाहीत. त्यानंतर गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्यासह  सहकारसूर्य मुख्यालयाच्या विविध विभागात जाऊन पाहणी केली व अगदी दहा वर्षापूर्वी दोन खाल्यांमध्ये सुरु केलेल्या गोदावरी अर्बनचा हा प्रवास आज पाच राज्यात जोमाने पसरल्याचे बघून समाधान व्यक्त केले. 

           दरम्यान बँक आफ महाराष्ट्र लातूर शाखेतील अधिकारी श्री श्रोत्री यांनी देखील गोदावरी अर्बन  संस्थेने सहकार क्षेत्रात घेतलेल्या उत्तुंग भरारीची तोंडभरुन प्रशंसा केली. व गोदावरीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी गोदावरी अर्बन मुख्यालयाचे मुख्यालय प्रधान व्यवस्थापक विजय श्रीमेवार, मुख्य शाखा व्यवस्थापक अविनाश बोचरे पाटील, गोपाल जाधव यांच्यासह संस्थेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News