ता. 8 रोजी सकाळी 10 वा. नांदेड आकाशवाणीवर हर घर तिरंगा उपक्रमा संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Sunday, August 7, 2022

ता. 8 रोजी सकाळी 10 वा. नांदेड आकाशवाणीवर हर घर तिरंगा उपक्रमा संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखतनांदेड,ता.7 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रमा संदर्भात नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात येणारे कार्यक्रम आणि नियोजन याविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत आज सोमवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता नांदेड आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार आहे. 

     सदर मुलाखतीमधून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर जिल्हा परिषदेमध्ये राबवण्यात आलेले उपक्रम तसेच 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रमाची पूर्वतयारी, नियोजन व विविध उपक्रम या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी मुलाखतीतून माहिती दिली आहे. तरी सर्व श्रेत्यांनी ही मुलाखत ऐकावी असे आवाहन नांदेड आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी तथा कार्यालय प्रमुख विश्वास वाघमारे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News