मुक्ताबाई यादवराव पाटील यांचं निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Saturday, August 13, 2022

मुक्ताबाई यादवराव पाटील यांचं निधन

 किनवट : रमाईनगर, गोकुंदा येथील ज्येष्ठ  नागरिक मुक्ताबाई यादवराव पाटील ( वय ७२ वर्षे ) यांचं शनिवारी (ता.१३) दुपारी १:४५ वाजता दीर्घ आजाराने निधन झालं.

        त्यांचे पती मौजे घोटी येथील मूळनिवासी तथा निवृत्त शिक्षक यादवराव चोखाजी पाटील हे नोकरीच्या निमित्त चिंचखेड येथेच स्थायिक झाले होते. तिथे मुक्ताबाई यांनी आपल्या मुला-मुलींचं शिक्षण पूर्ण करण्यावर भर दिला तसेच मुलांना व्यावसायिक बनविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.  

        त्यांच्या पार्थिवावर रविवारी (ता. १४ )  सकाळी १०:३० वाजता किनवट बसस्थानका जवळील शांतीभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार असून नामदेव कानिंदे यांच्या त्या मोठ्या आई व जावरला येथील बातमीदार माधव शेंद्रे यांच्या त्या सासु होत.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News