राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, August 14, 2022

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

 



 

मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.


          त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे  सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.


 राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.


इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:


 


सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास


सुधीर मुनगंटीवार-वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय


चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य


डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास


गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण


गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता


दादा भुसे- बंदरे व खनिकर्म


संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन


सुरेश खाडे-कामगार


 संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन


 उदय सामंत-उद्योग,


प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण


रवींद्र  चव्हाण -सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण


अब्दुल सत्तार-कृषी


दीपक केसरकर-शालेय शिक्षण व  मराठी भाषा


अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण


शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क


मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News