मेटे यांच्या अपघातानानंतर IRB चा हलगर्जीपणा, कोट्यवधी रुपयांचा टोल घेणारे IRB ची सुरक्षा यंत्रणा बेपत्ता -सुरेश नंदिरे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, August 14, 2022

मेटे यांच्या अपघातानानंतर IRB चा हलगर्जीपणा, कोट्यवधी रुपयांचा टोल घेणारे IRB ची सुरक्षा यंत्रणा बेपत्ता -सुरेश नंदिरे

 


मेटे यांच्या अपघातानानंतर IRB चा हलगर्जीपणा, कोट्यवधी रुपयांचा टोल घेणारे IRB ची सुरक्षा यंत्रणा बेपत्ता दोन वर्षांपूर्वी काय झाले होते, ही वंचित बहुजन आघाडीचे माजी प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी सांगितलेली आपबिती येथे देत आहोत - संपादक


         शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज पहाटे दुर्दैवी निधन झाले. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघात विनायक मेटे गंभीर जखमी झाले होते. अपघातानानंतर त्यांना कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. रात्री साडेतीनला अपघात झाल्यानंतर सकाळी सहा वाजता गंभीर जखमी झालेल्या मेटे यांना तब्बल अडीच तासा नंतर रुग्णालयात नेण्यात आले, तो पर्यंत मेटे, त्यांचा सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक त्या दाट अंधारात मदत मिळेल या अपेक्षेने पडून होते, मदत मिळाली मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. मेटे यांना वेळेवर मदत मिळाली असती तर कदाचित मेटे आज जिवंत असते, मात्र प्रशासनाचा हलगर्जीपणा मेटे तसेच हजारो, लाखो प्रवास करणाऱ्या लोकांच्या जीवावर बेतत असतो.  


कोट्यावधी रुपयांचा टोल वसूल करणारे IRB ची यंत्रणा गेली कुठे, अडीच तास मेटे यांना वैद्यकीय सुविधा मिळाली नाही, एकही रुग्णवाहिका मदतीसाठी आली नाही. IRB ची गस्ती पथक जातात कुठे. नियंत्रण कक्षातील कर्मचारी करतात काय, मुंबई ते पुणे दरम्यान एक्सप्रेसवेवर लावलेले CCTV कॅमेरे असूनही मेटे यांचा अपघात लक्षात का आला नाही. शिवाय पोलिसांचे गस्ती पथक अडीच तासात फिरकलेच नाही का ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित राहिले आहेत, 


मी देखील या प्रसंगातून गेलो आहे. दोन वर्षांपूर्वी कर्जतहुन मुंबईकडे येत असताना असाच माझ्या गाडीला अपघात झाला होता. गाडीचा मागील टायर फुटल्याने आम्ही रात्रीच्या अंधारात एक तासाहुन अधिक काळ IRB च्या नियंत्रण कक्षाकडे मदत मागत होतो, मात्र त्यांनी मदत दिली नाही, IRB चे अधिकारी केवळ खोटे बोलून वेळ मारून नेतात,पण मदत करीत नाही,  त्याबाबत घडलेल्या घटनेची माहिती मी सोशल मीडियावर टाकली होती, ती माहिती आज जशीच्या तशी मेटे यांच्या निमित्ताने पुन्हा सेंड करीत आहे. 


*एक्सप्रेसवरील कटू अनुभव, मदत तर नाहीच पण संकटात सापडलेल्या प्रवाशांची लूटमार*


कर्जतचे काम आटपून इक्को कार ने मी आणि सहकारी मुंबईच्या दिशेने निघालो होतो, शेडुंग टोलनाक्यावर 40 रुपयांचा टोलभरून आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेसवर आलो, पनवेल केवळ 4 किलोमीटर अंतरावर असताना आमच्या गाडीचा अचानक टायर फुटला, तात्काळ आम्ही गाडी बाजूला घेतली, सुदैवाने मोठा अपघात टळला होता, अन्यथा अशा अपघातात गाड्या पलटण्याचा धोका जास्त असतो, तसे काही झाले नाही, 70 km च्या वेगात असलेली गाडी रस्त्याच्या कडेला उभी होती, आमच्या बाजूने 150 ते 180 च्या वेगाने अनेक गाड्या जात होत्या, मनात आले अश्या वेगवान गाड्यांचे टायर फुटले तर किती भीषण अपघात होऊ शकतो, कारण या ठिकाणी अशा गाड्यांच्या वेगाला नियंत्रण करण्यासाठी काहीच यंत्रणा दिसत नव्हती, आमच्या गाडीचा टायर फुटल्यानंतर गाडीच जॅक आणि स्टेपनी होती, मात्र टायर बदलण्यासाठी पाहिजे असलेले पान्हे नव्हते, टोल पावतीच्या मागे अडचणीत असलेल्या प्रवासासाठी मोबाईल क्रमांक असतात, मात्र आम्ही घेतलेल्या टोल पावतीवर कोणतेही हेल्पलाईन मोबाईल क्रमांक नव्हते, मात्र ते असायला हवे होते, त्यानंतर मी गूगल सर्च करून एक्सप्रेसवरचा हेल्पलाइन क्रमांक (9822498224) शोधून काढला, 6,30 वाजता मी एक्सप्रेसच्या हेल्पलाईनला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला, त्यांनी मदत पाठवतो असे सांगितले, आमची गाडी शेडुंग आणि पनवेलच्या मध्ये उभी होते, त्यामुळे मदत लवकर मिळण्याची अपेक्षा होती, मदत येईपर्यंत अंधार झाला होता, अनेक वाहनांना मदतीसाठी थांबविण्याचा प्रयत्न देखील केला मात्र काहीच उपयोग झाला नाही, एकही गाडी थांबणार नाही याची कल्पना आम्हाला होती, मात्र मदत मिळविण्यासाठी जे करता येणार होते ते प्रयत्न आम्ही करत होतो, अर्धा तास होऊन गेला तरी मदत आली नव्हती, शिवाय उभ्या असलेल्या गाड्याना मागून धडक देऊन अपघात होण्याचे प्रमाण देखील खूप आहेत, मुंबई मनपाचे जनसंपर्क अधिकारी दादासाहेब शिवजातक अश्याच अपघातात पनवेल येथे गेले, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला दुसऱ्या वाहनाने मागून धडक दिली होती,हा तर एक्सप्रेस वे होता, कधी काहीही होऊ शकते, याची कल्पना हेल्पलाइनच्या लोकांनाही असायला हवी तरीही  मदत मिळायला उशीर होत होता,                  

       अर्ध्या तासाने मी हेल्पलाईन ला परत फोन केला, त्यावर त्याने पुन्हा तोच प्रश्न केला तुम्ही कुठे उभे आहेत, माईल स्टोन जवळ पास आहे का? त्यावर त्यांना सांगितले पहिल्या फोनवर तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली असताना तुम्ही मदत पाठविण्याऐवजी अजूनही चौकशी का करीत आहात, माझी गाडी उभी असल्यापासून 30 मीटरवर एक किलोमीटरचा बोर्ड होता, त्यावर ठाणे 33 किलोमीटर असल्याचे मी हेल्पलाईनला सांगितले होते, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे आता लक्षात आले, आम्ही मदत पाठवली आहे तुम्हाला 10 मिनिटात मदत येईल असे त्यांनी मला परत सांगितले, आणि फोन ठेऊन दिला,  

       त्यानंतर 15 मिनिटांनी पुण्याकडे जाणारी एक टोचन गाडी (मिनी क्रेन) आमच्या विरुद्ध दिसेला येऊन उभी राहिली, आम्हाला वाटले हेल्पलाईन वाल्यानी मदत पाठवली आहे, त्या गाडीतील ड्रायव्हर खाली उतरून त्याने एक्सप्रेस क्रॉस केला आणि आमच्या जवळ आला, आम्हाला नेमकी काय मदत हवी आहे ते सांगितले, त्याने आम्हाला केवळ स्टेपनी लावायचे 400 रुपये सांगितले, आमच्याकडे पान्हा नसल्याने शिवाय अंधारात गाडी उभी असल्याचे पाहून तो मनाला वाटेल तो चार्ज सांगत होता, ही एक प्रकारची लुटमारच होती, नॉर्मल ठिकाणी 50 ते 100 रुपयांत स्टेपनी लावली जाते, त्यावर त्याला मी विचारले हेल्पलाईनवाले इतका जास्त चार्ज लावतात का? त्यावर तो म्हणाला आमचा आणि हेल्पलाईनवाल्याचा काहीच संबंध नाही, मी पुण्याला निघालो होतो, तुमची गाडी बंद असल्याचे पाहून मी तुम्हाला मदत करायला आलो आहे, मी त्याला विचारले तुम्हाला हेल्पलाईनवाल्यानी पाठवले नाही का? त्याने नाही असे उत्तर दिले, म्हणजेच सव्वा तासानंतरही हेल्पलाईनची आम्हाला मदत मिळाली नव्हती, त्याला स्टेपनी बदली करायला सांगून, मी पुन्हा हेल्पलाईनला फोन केला आणि मदत का अजून आली नाही असा जाब विचारला, करोडो रुपयांचा टोल घेता मात्र प्रवाशांना तुम्ही काहीच सुरक्षा आणि मदत देत नाही, त्यावर त्याने सांगितले मी गस्ती व्हॅन केव्हाच पाठवली आहे ती येतच असेल, आता शिफ्ट चेंजिंगचा टाइम झाला आहे म्हणून उशीर झाला असेल, शिवाय टायर पंक्चर होणे किंवा फुटणे अश्या लोकांना आम्ही मदत करीत नाही असे धडधडीत त्याने उत्तर दिले, त्यावर मी सांगितले,  6 वाजता कोणत्या कामगारांची शिफ्ट चेंज होते, शिवाय या ठिकणी एकादी महिला मदत मागत असते तर तुम्ही त्यांना असेच दिड तास रस्त्यावर उभे करून असेच कारणे सांगत राहिले असते का, त्यावर आमच्या नियमानुसारच आम्ही मदत करू, असे निर्लज्जपणे उत्तर दिले, त्यावर त्यांचे नाव विचारले तर सय्यद असल्याचे सांगितले, त्यावर मी सांगितले हेल्पलाईन च्या नावाखाली तुमची काहीच मदत मिळाली नाही, दिडतासात माणूस पुण्याला पोहचतो मात्र 150 किलोमीटरच्या परिसरात तुमची एकही गस्ती व्हॅन नाही का? मग तुम्ही कसली मदत करता, 400 रुपये ही लूटमार नाही का, कोट्यवधी रुपयांचा टोल घेता मात्र प्रवाशाना सुरक्षा काय आहे, याबाबत तुमची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करू, असे सांगितले, तर तुम्हाला जे करायचे आहे ते करा आम्हाला काही फरक पडत नसल्याचे त्यांनी सांगितले, 

     मुंबई पुणे एक्सप्रेस वरून प्रवास करणाऱ्या लोकांनी यांच्या हेल्पलाईनवर विसंबून राहू नये, प्रवासाला निघताना महत्त्वाचे फोन नंबर सोबत घेऊनच निघावे, महिला प्रवाशानी अश्या लोकांची मदत घेण्याऐवजी पोलीस मदत घ्यावी, मात्र एक्सप्रेसच्या हेल्पलाईन वर विसंबून राहू नये,        

            अखेर आम्ही सव्वा आठला निघोलो, शेवटपर्यंत हेल्पलाईनची मदत आम्हाला मिळाली नव्हती, एक्सप्रेस हेल्पलाईनचा अधिकारी खोटे बोलून वेळ काढून नेत होता, निघताना मनात एकच प्रश्न होता, आमच्या जागेवर एखादी महिला या अंधारात उभी राहून मदत मागत असते तर तिची काय अवस्था झाली असती,

प्रसंग काल दिनांक 19,02,2020 रोजी सायंकाळी 6,30 ते सव्वा आठ दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर,,,, 


-सुरेश नंदिरे

प्रसिद्धी प्रमुख

वंचित बहुजन आघाडी

9867600300


टिप  - त्या वेळी मी वंचित बहुजन आघाडीचा राज्य प्रसिद्धी प्रमुख होतो. आता राजीनामा दिला आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News